• Total Visitor ( 636620 )

लवकरच मुंबई – गोवा महामार्ग ग्रीनफिल्ड ॲक्सेस कंट्रोल रस्ता बनवणार

Raju Tapal January 24, 2023 233

लवकरच मुंबई – गोवा महामार्ग ग्रीनफिल्ड ॲक्सेस कंट्रोल रस्ता बनवणार



मुख्यमंत्री एकनाथ शिंदे



ठाणे - कोकणच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी आपण स्वतः तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कटीबद्ध आहोत. तेव्हा, समृद्धी महामार्ग आणि मुंबई-पुणे एक्सप्रेस वे च्या धर्तीवर लवकरच मुंबई – गोवा महामार्ग ग्रीनफिल्ड ॲक्सेस कंट्रोल रस्ता बनवणार असुन कोकणच्या पर्यटन वृद्धीसाठी एमएसआरडीसीच्या माध्यमातुन कोस्टल रोडचेही रुंदीकरण करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी रात्री ठाण्यातील एका कार्यक्रमात बोलताना दिली.



ठाण्यातील शिवाई नगर येथील उन्नती मैदानात कोकण ग्रामविकास मंडळाच्यावतीने आयोजित केलेल्या मालवणी महोत्सवाचा समारोप रविवारी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मंडळाचे अध्यक्ष सीताराम राणे, स्नेहलता सीताराम राणे, हौसिंग फेडरेशनचे संचालक विनोद देसाई आदी उपस्थित होते. याप्रसंगी राणे दांपत्याने भव्य भित्त्तीचित्राची प्रतिमा सदिच्छा भेट देऊन मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. शिदे यांच्या रूपाने मालवणी महोत्सवात प्रथमच मुख्यमंत्र्यांची उणीव पूर्ण झाली.अशी भावना सीताराम राणे यांनी व्यक्त केली.तर, व्यासीठावरून संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी, अशा प्रकारचे मालवणी महोत्सव म्हणजे, रसिक, खवय्यांसाठी मेजवानी आणि पर्वणी असते. जसा फणस जरी वरून काटेरी असला तरी, आतुन गोड असतो.तशीच आमची ही कोकणातील माणसे आहेत.अशी भलामण करीत मुख्यमंत्री शिंदे यांनी महोत्सवाचे कौतुक केले. पुढे बोलताना, कोकणच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी आपण स्वतः तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कटीबद्ध असल्याचे सांगितले. त्याचबरोबर बिकट बनलेला मुंबई – गोवा महामार्ग लवकरच मुंबई-पुणे एक्सप्रेस वे तसेच, समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर ग्रीनफिल्ड ॲक्सेस कंट्रोल असा महामार्ग बनवणार असल्याचा निर्णय आपण तसेच देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्याचे सांगितले.



त्याचप्रमाणे, कोकणात पर्यटनाला वाव असल्याने त्यासाठी चांगले इन्फ्रास्ट्रक्चर व उत्तम कनेक्टीव्हीटी निर्माण व्हावी, यासाठी एमएसआरडीसीच्या माध्यमातुन सिंधुदुर्गातील कोस्टल रस्त्यांचेही रुंदीकरण करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे, सर्व बीच कनेक्ट होऊन पर्यटन वाढीला मदत होईल.असेही स्पष्ट केले. दरम्यान या महोत्सवात एसटीने आलेल्या दौंडच्या आजीच्या कौतुक करताना मुख्यमंत्री शिंदे यांनी माणसाने घरातून बाहेर पडले पाहिजे तरच, तब्बेत ठणठणीत राहते. असे सांगुन एकप्रकारे उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता टोला लगावला.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement