*पत्रकारिता क्षेत्रातील कुशल संघटक- अशोकराव उगले*
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील डोंगरगाव या छोट्या गावी श्री अशोकराव कारभारी उगले यांचा २० फेब्रुवारी १९८१ रोजी जन्म झाला. राजकीय ,सामाजिक, शैक्षणिक वारसा नसतांना केवळ
व्यापक जन संपर्क, सामाजिक धार्मिक कामावर अतिशय दृढ निष्ठा, लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांशी आपुलकीने संवाद साधणारा, कोणाच्याही मदतीसाठी सदैव तत्पर असणारे, मन मोकळा स्वभाव, स्मित भाषी, सदैव हसतमुख असणारे, अगदी अल्पावधीतच तालुक्यात सर्वांचे आवडते झालेले आमचे मित्र मा. *श्री अशोकराव कारभारी उगले* यांचा आज वाढदिवस त्या निमित्ताने त्यांना आमच्या पत्रकार मित्र परिवार कडून हार्दिक शुभेच्छा...
अशोकराव उगले यांचा जन्म गरीब शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण झाले. इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणोरे, व छत्रपती शिवाजी विद्यालय गणोरे येथे झाले, पुढे प्रवरानगर लोणी येथे व्यवसायिक शिक्षण घेऊन ते बाहेर पडले. त्यानंतर घरचे वातावरण शेतीला पोषक असल्यामुळे घरची शेती करण्यास सुरवात केली त्यानंतर स्वतःची शेती उत्तम रीतीने करून त्यांनी कुटुंबाला प्रगतीच्या वाटेवर नेले.
पुढे हळूहळू सामाजिक कामाची सुरुवात करून ते प्रथम पत्रकारिता करू लागले. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस *डॉ श्री विश्वासराव आरोटे* यांचे जवळचे विश्वासू सहकारी म्हणून व कामाची तळमळ पाहून व त्यांच्यातील संघटन कौशल्य पाहून त्यांनी अशोकराव उगले यांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अकोले तालुका अध्यक्ष पद सलग चार वेळा मिळाले. सध्या तालुका अध्यक्ष पद सांभाळत आहे. तसेच अशोकराव दैनिक समर्थ गावकरी चे प्रतिनीधी म्हणून काम पाहत आहे. व पुण्य वार्ता वेब न्यूज पोर्टल चे मुख्य संपादक आहेत. तसेच ए व्ही पी वृत्तवाहिनी चे समूह संपादक आहेत. यातूनच त्यांचे पत्रकारिता क्षेत्रातील योगदान महत्वपूर्ण आहे हे दिसुन येते.
त्यांनी सामाजिक क्षेत्रात ही आपल्या कामाचा ठसा उमटवला त्यामुळेच
अशोकराव हे सध्या डोंगरगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटी विद्यमान संचालक आहे.डोंगरगाव चे उपसरपंच पदही त्यांनी सक्षमपणे सांभाळले.
त्यांच्या महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्ष पदाच्या काळात त्यांनी अनेक उपक्रम राबविले. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, मान्यवरांना पूरस्कार, एमपीएससी, यूपीएससी विद्यार्थी यांचा सन्मान, पत्रकाराना दिवाळी भेट, शालेय विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके दप्तर वाटप,पत्रकारांचे वाढदिवस साजरे करणे,पत्रकारांवर अन्याय झाल्यास त्यास प्रत्युत्तर देणे, विविध व्याख्यात्यांचे व्याख्यानाचे आयोजन असे विविध उपक्रम राबविले.
त्यांनी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष पद सांभाळले.त्यामुळेच त्यांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने शिर्डी येथे उत्कृष्ट तालुका अध्यक्ष म्हणून सन्मान करण्यात आला. तसेच सरपंच सेवा संघाचा आदर्श पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.तसेच या वर्षी दैनिक गावकरी समूहाचा स्टार ऑफ दि इयर पत्रकार हा मानाचा पुरस्कार शिर्डी येथे प्रदान करण्यात आला.
अशा हरहुन्नरी, कुशल कष्टाळू ,मनमिळाऊ व्यक्तिमत्त्वाला *वाढदिवसाच्या* *लाख लाख शुभेच्छा.* ...