• Total Visitor ( 765575 )
News photo

मांडा पश्चिमेतील ‘बिकानेर स्वीट्स’ दुकानामध्ये अस्वच्छता,माशांचा वावर...ग्राहकांनी घेतलेल्या मिठाईबाबत गंभीर प्रश्न

Raju Tapal publisher October 10, 2026 106

मांडा पश्चिमेतील ‘बिकानेर स्वीट्स’ दुकानामध्ये अस्वच्छता,माशांचा वावर...ग्राहकांनी घेतलेल्या मिठाईबाबत गंभीर प्रश्न



राजू टपाल.

टिटवाळा : मांडा पश्चिमेतील वासुंद्री रोडवरील पंचवटी जवळ असलेल्या  ‘बिकानेर स्वीट्स’ या दुकानात अस्वच्छतेचा कळस असल्याचे पहावयास मिळत आहे.

दुकानात सर्वत्र अस्वच्छता असून माशांचा वावर असल्याचेही सर्रास दिसून येत आहे. विशेष म्हणजे ग्राहकाकडून दुकानदाराला माश्या हाकलण्यास सांगून तीच मिठाई ग्राहक ही खरेदी करीत असल्याने ग्राहकांनाही या स्वच्छतेची जणू सवयच झाल्याचे दिसून येत आहे.

तिथे उघड्यावर पडलेले खमंग,जिलेबीवर माश्यांचा कब्जा केलेला असल्याचे दिसून येते. दुकानाच्या बाहेरच पदपथावर जिलेबी तळण्यासाठी कढई गॅस सिलेंडर तसेच त्यावर छत्री

टाकून रस्ताही अडविल्याचे दिसून येत आहे. तिथेही उघड्यावर पडलेल्या अन्नपदार्थ,प्लेट्स, चटण्यांवर माश्या घोंघावत असल्याचे दिसून येत आहे. तसेच शासनाने नवीन नियमानुसार सर्व मिठाई यांच्या समोर कधी बनवले व कधी मुदत संपणार याची माहिती ठेवण्यासाठी सांगितलेले असूनही सदरील दुकानात या सर्व नियमांना फाट्यावर मारण्यात येत आहे.

शुक्रवारी रात्री एका ग्राहकाने याबाबतचा व्हिडिओ काढून पत्रकार राजू टपाल यांना पाठवल्यानंतर टपाल यांनी खातरजमा करण्यासाठी सदर ठिकाणी शनिवारी दुपारी वाजण्याच्या सुमारास भेट देऊन पाहणी केली असता आजही तिथे अस्वच्छता तसेच   माश्या ह्या अन्नपदार्थांवर घोंघावताना दिसून येत होत्या. याबाबत तिथे उपस्थित असलेल्या भवर नामक कामगाराने माश्यांना कितीही हकलन्याचा प्रयत्न केला तरीही माश्या ह्या पुन्हा पुन्हा येत असल्याचे निर्लज्जपणे सांगत आहे.

दुकान चालकाचे नाव सोमाराम देवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. ‘बिकानेर स्वीट्स’ नावाची टिटवाळ्यासह विविध ठिकाणी सात ते आठ दुकाने असल्याचेही सांगण्यात येत आहे. या आधीही त्यांच्या एका दुकानात एक्सपायरी झालेला माल आढळून आला होता.   

FDA कारवाई करणार का?

महाराष्ट्राचे FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सध्या अन्नसुरक्षेबाबत राज्यभर तपासणी आणि कारवाई सुरू आहे. सणासुदीच्या काळात मिठाई, खाद्यतेल आणि दुग्धजन्य पदार्थांसह उच्च-जोखमीच्या खाद्यपदार्थांवर विशेष लक्ष दिले जात असल्याचे अलीकडेच स्पष्ट करण्यात आले आहे.

अशा परिस्थितीत मांडा टिटवाळ्यातील या दुकानाची FDA कडून तपासणी होणार का? दुकानातील खाद्यपदार्थांचे नमुने घेतले जाणार का? याकडे आता मांडा टिटवाळावासीयांचे लक्ष लागले आहे.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement