२९ ऑगस्ट२०२६ रोजी मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनानिमित्त महापालिका क्षेत्रातील शाळांमध्ये "राष्ट्रीय क्रीडा दिन" (National Sports Day - NSD) २०२६ साजरा
केंद्र शासनाच्या तसेच राज्य शासनाच्या निर्देशानुसार मा शिक्षण संचालक तसेच मा शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद ठाणे यांचे सुचनेनुसार महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील महानगरपालिका शाळांमध्ये तसेच सर्व व्यवस्थापनाच्या खाजगी अनुदानित व विनाअनुदानित शाळांमध्ये 'राष्ट्रीय क्रीडा दिन' (NSD) काल अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. यावर्षी भारत सरकारच्या युवक कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या 'फिट इंडिया चळवळी अंतर्गत "खेलेगा भारत, जीतेगा भारत" या संकल्पनेखाली (Theme) दिनांक २८ ते ३० ऑगस्ट २०२६ या कालावधीत तीन दिवसीय देशव्यापी अभियान आयोजित करण्यात आले आहे. भारतीय खेळ प्राधिकरणाच्या (SAI) मार्गदर्शक सूचनांनुसार (SOP),सदर तीन दिवसीय अभियानांतर्गत कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील सर्व प्राथमिक,माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये खालीलप्रमाणे दिनांक 28 ते 30 या कालावधीत विविध क्रीडा विषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे
१. दिनांक २८ ऑगस्ट २०२६ (शुक्रवार)- आदर व लोकसहभाग (Tribute):सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून,'फिट इंडिया तंदुरुस्ती प्रतिज्ञा देण्यात आली.
2. विद्यार्थ्यांसाठी शालेय स्तरावर "२९ चॅलेंज" (२९ Challenge),'पास द बॉल' आणि 'स्पोर्ट्स बंधन यांसारख्या क्रीडा आव्हानांचे आयोजन करणे,राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या संकल्पनेवर आधारित निबंध स्पर्धा,चित्रकला स्पर्धा आणि पोस्टर मेकिंग स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले.
२. दिनांक २९ ऑगस्ट २०२६ (शनिवार) - खेळ (Play) - मुख्य क्रीडा दिवस "एक घंटा खेल के मैदान में" (Ek Ghanta Khel Ke Maldan Meln): या गुख्य दिवशी राज्यातील सर्व शाळा व महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अनिवार्यपणे मैदानावर उतरून किमान एक तास आवडीचे खेळ खेळणे बंधनकारक करण्यात आलेले होते त्यानुसार सर्व शाळांमध्ये विविध खेळांचे आयोजन करण्यात आले .
3. शाळांमध्ये 'वर्ग विरुद्ध वर्ग किंवा 'शिक्षक विरुद्ध विद्यार्थी असे व्हॉलीबॉल,खो-खो,कबड्डी,लगोरी आणि लेझिम यांसारख्या पारंपरिक व देशी खेळांचे मैत्रीपूर्ण सामने आयोजित करणे.या दिवशी सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी अनिवार्यपणे क्रीडा पोशाख (Sports Attire) परिधान केलेला होता.
3. दिनांक ३० ऑगस्ट २०२६ (रविवार) गतिशीलता (Move):स्थानिक स्तरावर विद्यार्थी,एनसीसी (NCC) आणि एनएसएस (NSS) स्वयंसेवकांच्या मदतीने 'संडेज् ऑन सायकल' (Sundays on Cycle) अंतर्गत सायकल रॅली,प्रभात फेऱ्या किंवा वॉकथॉनचे आयोजन करणेबाबत महाविद्यालय शाळा स्तरांवर नियोजन करण्यात आलेले आहे. वरील प्रमाणे तीन दिवस विविध क्रीडा विषयक उपक्रम आयोजित करून राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला आहे.