मुलुंडमधून 20 वर्षीय तरुणी बेपत्ता...माहिती असल्यास तातडीने संपर्क साधण्याचे आवाहन
मुंबईतील मुलुंड परिसरातून 20 वर्षीय अंशिका राजेश शर्मा ही तरुणी बेपत्ता झाली असून,याप्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी बेपत्ता व्यक्तीची नोंद करून तिचा शोध सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार,23 जून 2026 रोजी अंशिका बेपत्ता झाली. तिचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू असून,नागरिकांनीही सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अंशिका शर्मा हिच्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तिचे वडील राजेश शर्मा यांच्याशी तातडीने संपर्क साधावा. संपर्क क्रमांक: 79778 66217 अंशिका दिसल्यास किंवा तिच्याबाबत कोणतीही माहिती असल्यास जवळच्या पोलीस ठाण्यात अथवा वरील क्रमांकावर त्वरित कळवावे,असे आवाहन करण्यात आले आहे.