स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा; कल्याण ग्रामीणमध्ये शेखर लोणे यांच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांना ३ हजार वह्यांचे वाटप
खडवली:- भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन कल्याण ग्रामीण परिसरातील विविध जिल्हा परिषद शाळांमध्ये देशभक्तीच्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे विकासपुरुष आमदार किसन कथोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ग्रामीण भागातील शाळकरी विद्यार्थ्यांना तब्बल ३ हजार वह्यांचे वाटप करण्यात आले.विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे,त्यांच्या शैक्षणिक वाटचालीला बळ मिळावे आणि आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध व्हावे,या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला.भाजप कल्याण ग्रामीणचे अध्यक्ष शेखर लोणे यांनी स्वखर्चातून ३ हजार वह्या उपलब्ध करून विद्यार्थ्यांना वितरित केल्या.यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.यावेळी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत,घोषवाक्ये आणि विविध कार्यक्रमांमधून राष्ट्रप्रेमाची भावना व्यक्त केली.देशभक्तीचा उत्साह,शिक्षणाची नवी उमेद आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याचा संकल्प,या भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे पालक व नागरिकांकडून कौतुक करण्यात आले.आमदार किसन कथोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शेखर लोणे यांच्या पुढाकारातून राबविण्यात आलेल्या या शैक्षणिक उपक्रमामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना मोठा हातभार मिळाला आहे.