शिरूर बाजार समिती संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी ३०० उमेदवारी अर्ज दाखल
कोंढापुरीचे स्वप्निल गायकवाड निवडणुक रिंगणात
शिरूर:- शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ५ जुलैला होणा-या १८ जागांसाठी ३०० उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
कोंढापुरी येथील माजी सरपंच,सोसायटीचे माजी चेअरमन स्वप्निल अरूणराव गायकवाड यांनीही या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला असून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. सेवा सहकारी संस्था मतदार संघातील एकूण ११ जागांसाठी १३१ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून महिलांसाठी राखीव असलेल्या ७ जागांसाठी २४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी ३५, विमुक्त जाती भटक्या जमातीच्या एका जागेसाठी १८ अर्ज दाखल झाले आहेत. ग्रामपंचायत मतदार संघातील दोन जागांसाठी ३५ अर्ज अनुसूचित जाती जमातीच्या एका जागेसाठी ११ अर्ज,आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या एका जागेसाठी १७ अर्ज दाखल झाले आहेत.
हमाल मापाडी मतदार संघातील एका जागेसाठी ७ तर,व्यापारी आडते प्रतिनिधींच्या २ जागांसाठी २२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत सोमवार दि.८ जून २०२६ असून उमेदवारी अर्जांची छाननी,माघारीनंतर अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.