• Total Visitor ( 385214 )

कल्याण डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी काल दिवसभरात ३११ कर्मचा-यांनी बजावला टपाली मतदानाचा हक्क ! 

Raju tapal January 10, 2026 21

कल्याण डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी काल दिवसभरात ३११ कर्मचा-यांनी बजावला टपाली मतदानाचा हक्क ! 



सार्वत्रिक निवडणूकीत निवडणूक कर्तव्यावर अधिकारी/कर्मचारीवर्गास आपला मतदानाचा हक्क बजावता यावा याकरिता महापालिकेने टपाली मतदानाची सुविधा दि. ९,१० व ११ जानेवारी रोजी सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात उपलब्ध करुन दिलेली आहे. महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी दि.१५ जानेवारी रोजी मतदान व दि.१६ जानेवारी मतमोजणीची प्रकिया पार पाडणार आहे. या प्रक्रियेसाठी मोठया प्रमाणावर अधिकारी/कर्मचा-यांची नेमणूक निवडणूक कामासाठी करण्यात आली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत मतदार म्हणून नोंदणी असणारे मात्र कल्याण डोंबिवली महापालिकेमधे अथवा अन्यत्र जसे की बृहन्मुंबई महानगरपालिका/ अंबरनाथ नगरपरिषद इत्यादी येथे निवडणूक कर्तव्यावर नियुक्त असणारे अधिकारी/ कर्मचारी यांना १५ जानेवारी २०२६ रोजी प्रत्यक्ष उपस्थित राहून मतदान करणे शक्य होणार नसल्याने त्यांचेकरिता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने आपल्या हद्दीतील सर्व ०९ निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात दिनांक ९,१० व ११ जानेवारी २०२६ रोजी “विशेष टपाली मतदान सहायता कक्ष” स्थापन केले असून उपरोक्त दिवशी सकाळी ९ ते सायंकाळी ६ या कालावधीत सदर कर्मचारी प्रत्यक्ष उपस्थित राहून मतदान करू शकतील यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे. या सुविधेत दिनांक ०९ जानेवारी २०२६ रोजी काल दिवसभरात ३११ अधिकारी/कर्मचा-यांनी टपाली मतदानाचा हक्क बजावला आहे. हि टपाली मतदानाची सुविधा आज म्हणजे दि.१० जानेवारी,दि.११ जानेवारी रोजी उपलब्ध राहिल अशी माहिती टपाली मतदानाचे समन्वय अधिकारी विजयकुमार द्वासे यांनी दिली आहे.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement