अमेरिकेत राहणारी 34 वर्षीय ॲलिसिया मॉन्टॅनो ही गर्भधारणेच्या आठव्या महिन्यात असताना शर्यतीबद्दलचा तिचा उत्साह
एकीकडे गर्भवती महिलांना आठव्या महिन्यात हालचाल करताना त्रास होतो, दुसरीकडे या महिलेने गरोदरपणाच्या आठव्या महिन्यात धावत जाऊन चमत्कार घडवला आहे. अमेरिकेत राहणारी 34 वर्षीय ॲलिसिया मॉन्टॅनो ही गर्भधारणेच्या आठव्या महिन्यात असताना शर्यतीबद्दलचा तिचा उत्साह आणि जिंकण्याची तिची इच्छा इतकी होती की जिद्दीला पेटून उठलेल्या ध्येयापुढे तिने तिची गर्भधारणा आड येऊ दिली नाही.
आपल्या सर्वांना माहित आहे की 800 मीटर म्हणजे एका मोठ्या मैदानाच्या अंदाजे चार फेऱ्या. ॲलिसियाच्या पोटात आठ महिन्यांचे बाळ वाढत असूनही तिने ८०० मीटर धावत विक्रम केला आहे. यासाठी ती प्रशिक्षक आणि डॉक्टरांच्या संपूर्ण देखरेखीखाली दररोज सराव करत असे आणि त्यांच्या परवानगीनेच ती 800 मीटर धावली.
प्रत्येक स्त्री तिच्या आठव्या महिन्यात विश्रांती घेत असताना त्या कठीण काळात, ॲलिसिया उन्हात धावत राहिली. ही निश्चितच स्वतःहून मोठी गोष्ट आहे. गर्भवती असूनही धावणारी ती पहिली ऑलिम्पियन ठरली आहे. जेव्हा तिने शर्यत पूर्ण केली, तेव्हा सर्व लोकांनी उभे राहून तिला स्टँडिंग ओव्हेशन दिले आणि तिच्या कृतीबद्दल तिचे कौतुक देखील केले. ॲलिसिया मॉन्टॅनोची ही कथा प्रत्येक स्त्रीसाठी एक प्रेरणा आहे, जे हे दाखवते की आईचे धैर्य आणि तिची ईच्छाशक्ती कोणत्याही आव्हानावर मात करू शकते.