रायते येथे महिलांसाठी अनोखी दहीहंडी स्पर्धा...डोळ्यांवर पट्टी बांधून गोपाळकाल्याचा उत्साह...
रायते हायस्कूलच्या प्रांगणात सरपंच समिता सुरोशी यांच्या पुढाकाराने रंगला सांस्कृतिक सोहळा...महिला व मुलींचा उत्स्फूर्त सहभाग...
राजू टपाल.
रायते:- गोपाळकाला उत्सवानिमित्त रायते हायस्कूलच्या प्रांगणात महिलांसाठी अनोख्या डोळ्यांवर पट्टी बांधून दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सरपंच समिता संतोष सुरोशी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेला महिला व मुलींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत सहभागी प्रत्येक महिला स्पर्धकाला आपल्या वेषभूषेचे प्रदर्शन तसेच संवादासाठी एक मिनिटाचा वेळ देण्यात आला होता. विशेष आकर्षण ठरलेल्या विवाहित महिलांच्या ‘माँ यशोदा’ गटात जागृती शनी पवार यांनी प्रथम क्रमांक पटकावला. मुलींच्या गटात हार्दिका संतोष भोईर प्रथम,कृतिका नरेश भोडिंवले द्वितीय तर मन्विता शनी पवार यांनी तृतीय क्रमांक मिळवला. विजेत्यांना रोख स्वरूपात बक्षिसे देण्यात आली. विवाहित महिलांच्या गटात प्रियंका विजय सुरोशी प्रथम,नंदा केशव सुरोशी द्वितीय तर विणा रोहिदास पवार यांनी तृतीय क्रमांक मिळवला. विजेत्या महिलांना पैठणी देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेसाठी राधा,कृष्ण आणि यशोदा यांच्या व्यक्तिरेखांवर आधारित वेषभूषा करणे आवश्यक होते. तसेच स्पर्धकांनी आधार कार्ड सोबत आणणे अनिवार्य करण्यात आले होते. आपली संस्कृती,इतिहास आणि महापुरुषांच्या विचारांचा जागर करतानाच महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे,या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला आणि लहान मुली उपस्थित राहून सहभागी झाल्या. यावेळी माजी सरपंच संतोष नामदेव सुरोशी,उपसरपंच मयुर सुरेश सुरोशी, अंगणवाडी ताई सुनंदा पवार,कुसुम पवार,मदतनीस अनिता वाघे, अक्षता मार्के,प्राची प्रविण चंदणे,रूपाली अविनाश कांबळे,हर्षला अनंता लहांगे,सुवर्णा अशोक बांधणे,मोनिका जगन भोईर,सानिका भास्कर मिरकुटे,प्रियंका विजय सुरोशी,वैशाली गंभीरराव,रागिणी सुरोशी,शोभा ठाकरे,नंदा सुरोशी,चिम्मीबाई सुरोशी,जागृती पवार,विणा पवार,कांताबाई सुरोशी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओमसाई इंग्लिश स्कूलच्या अध्यक्षा तथा मुख्याध्यापिका प्रमिला विकास घोडविंदे यांनी अतिशय सुंदर पद्धतीने केले. त्यांच्या प्रभावी सूत्रसंचालनामुळे कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.