बल्याणीमध्ये अनधिकृत चिकन-मटन शॉपवर कारवाई !
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते गावदेवी मंदिर रस्त्यावरील १० दुकानांवर महापालिकेची कारवाई
राजू टपाल
टिटवाळा : बल्याणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते गावदेवी मंदिर या रस्त्यादरम्यान अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या चिकन-मटन शॉपवर महापालिकेने कारवाई केली. या कारवाईदरम्यान एकूण १० चिकन-मटन शॉपवर कारवाई करण्यात आली.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या संबंधित पथकाने ही कारवाई केली. सहाय्यक आयुक्त अनिता राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही मोहीम राबवली.
बल्याणी परिसरातील या रस्त्यावर अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या चिकन-मटन शॉपवर कारवाई करण्यात आल्याने परिसरात या मोहिमेची चर्चा सुरू आहे. महापालिकेच्या या कारवाईमुळे अनधिकृत व्यवसायांवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने प्रशासनाने पाऊल उचलल्याचे दिसून येते.
दरम्यान, परिसरातील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांबाबत महापालिका प्रशासनाकडून पुढे कोणती पावले उचलली जातात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.