पॅनल क्रमांक ३ मधून अॅड. हर्षाली राजाराम थविल (चौधरी) निवडणूक लढवणार
राजू टपाल.
टिटवाळा :- कल्याण डोंबिवली महापालिकेच्या माजी नगरसेविका तसेच माजी स्थायी समिती सदस्य व शिवसेना महिला उपशहर संघटक अॅड. हर्षाली राजाराम थविल (चौधरी) पॅनल क्रमांक ३ मधून अनुसूचित जमातीच्या महिला आरक्षणामधून निवडणूक लढवणार आहेत. अॅड. हर्षाली राजाराम थविल (चौधरी) ह्या अभ्यासू व उच्चशिक्षित पदवीधर असून त्यांचे बीएमएस,एलएलबी चे शिक्षण पूर्ण झालेले आहे. त्यांनी त्यांच्या मागील नगरसेवक पदाच्या कार्यकाळात वडवली व मोहने जोडनारा ब्रीज (ROB) बनविला. वडवली गेट नं.४७ ते गेट नं.४८ मुख्य रस्ता डांबरीकरण व गटार नविन तयार करण्यात आले. वडवली गावातील स्मशानभुमी नविन बांधण्यात आली. वडवली गावातील स्मशानभुमीकडे जाणारा रस्ता नविन तयार करण्यात आला. वडवली गावातील गावदेवी मंदिर जवळ ओपन जिम बसवण्यात आली. वडवली गावातील स्मशानभुमी जवळ नवीन गणेश घाट तयार करण्यात आला. ‘अ’ प्रभाग क्षेत्र कार्यालया जवळील आरोग्य केंद्र दुरूस्त करण्यात आले. वडवली गावातील मुख्य रस्त्याचे डांबरीकरण केले.वडवली गावातील आदिवासीपाड्यातील मुख्य रस्ता नविन तयार करण्यात आला.अटाळी गावातील स्मशानभुमी नविन बांधण्यात आली व जुनी स्मशानभुमी दुरूस्त करण्यात आली.अटाळी गावातील हनुमान मंदिर ते टेपा पर्यंत नविन रस्ता बनविण्यात आला. अटाळी गावातील स्मशानभुमीचा रस्ता बनवण्यात आला. वडवली - अटाळी प्रभागात विविध ठिकाणी नविन जलवाहिनी टाकण्यात आल्या.वडवली- अटाळी प्रभागात विविध ठिकाणी पोहचरस्ते व गटार पायवाटा बनविण्यात आले. वडवली गावातील गणेश मंदिर जवळ कोळी पुतळा बनविण्यात आला.वडवली अटाळी प्रभागात नविन पथदिवे व हायमास्ट लाईट्स बसवण्यात आले. वडवली - अटाळी प्रभागात शौचालये दुरूस्त करण्यात आले. तसेच त्यांच्या प्रभागात महाराष्ट्र शासनाचा तब्बल सात कोटी रुपयांचा विशेष निधी वापरून विकास कामे करण्यात आले. त्यामुळे त्यांनी आपल्या प्रभागात मुलभूत सोयी सुविधा यांना प्रामुख्याने प्राधान्य देत विकास कामे केलेली आहेत. त्यांच्या या कामांची पोचपावती म्हणून पॅनल क्रमांक ३ मधून अनुसूचित जमातीच्या महिला आरक्षणामधून त्या पुन्हा निवडणूक लढवणार आहे. आपल्या या विकास कामांची दखल मतदार नक्कीच घेतील अशी त्यांना आशा वाटते. जनतेच्या हक्कासाठी जनसेवेचा नवा अध्याय घेऊन नाळ निष्ठा जनतेची प्रत्येक अडचणीत उभी राहते पाठीशी हे ब्रीद वाक्य वापरीत त्यांनी आपल्या विकास कामांचा लेखाजोखा मांडलेला आहे. त्यांच्या या कामात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,खासदार श्रीकांत शिंदे,आमदार विश्वनाथ भोईर,माजी नगरसेवक दुर्योधन पाटील यांचेही मोलाचे सहकार्य मिळत असल्यानेच आपण या विश्वासावरच पुन्हा नशीब आजमावत असल्याचे थवील यांनी सांगितले.