• Total Visitor ( 427879 )
News photo

ॲड.हर्षाली थविल (चौधरी) याच महापौर पदाच्या प्रमुख दावेदार 

Raju tapal January 25, 2026 429

ॲड.हर्षाली थविल (चौधरी) याच महापौर पदाच्या प्रमुख दावेदार 



राजू टपाल.

टिटवाळा :- कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूका नुकत्याच पार पडल्या तसेच महापौर पदासाठी अनुसूचित जमाती प्रवर्गाला महापौर पदाचे आरक्षण जाहीर झाले आहे. शिवसेना शिंदे यांच्या पक्षामध्ये हर्षाली थविल,किरण भांगले तर मनसेच्या शीतल मंढारी या अनुसूचित जमातीचे नगरसेवक महापौर पदाच्या शर्तीत आहे. मात्र नागरिकांची पसंती हि दुसऱ्यांदा निवडून आलेल्या हर्षाली थविल यांच्याकडे आहे. हर्षाली थविल या उच्चशिक्षित आहे. त्यांचे शिक्षण वकिली क्षेत्रात झालेले असून मुंबई उच्च न्यायालयात 10 वर्षांपासून त्या सक्रिय आहेत. त्या प्रभाग क्रमांक 3(ब) मधून दुसऱ्यांदा भरघोस मतांनी निवडून आलेल्या आहेत. तर मागील प्रथम नगरसेवक टर्म मध्ये शिवसेना पक्षा कडून उमेदवारी लढवत सर्वात जास्त मतांनी विजयी उमेदवार म्हणून नावाजलेल्या होत्या. त्यांनी आपल्या नगरसेवक पदाच्या कारकिर्दीत खूपच उल्लेखनीय कामे केलेली आहेत. यात प्रामुख्याने आंबिवली उल्हास नदी येथील 15 वर्षांपासून अपूर्ण पडलेला रेल्वे ब्रिज स्वतः मंत्रालय व दिल्ली रेल्वे बोर्ड यांच्या सोबत पाठ पुरावा करून ब्रिज चे काम पूर्ण केले. कडोंमपाच्या इतिहासातील प्रथम नगरसेविका ज्यांनी मुख्यमंत्री कार्यालय,महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयातून 7 कोटीचा विशेष निधी मंजूर करून आणला आणि आपल्या व बाजूच्या वॉर्ड वडवली व आंबिवली परिसरात भरघोस कामे केली. यात प्रामुख्याने रस्ते,गटारे,स्म्शान घाट,ओपन जिम,गल्लोगल्ली पेवर ब्लॉकच्या पायवाटा,रस्ते व नविन बांधकाम साठी नविन पाईप लाईन्स,रिंग रूट मध्ये ज्या लोकांची घरे गेली आहेत. त्यांना स्वतः पाठपुरावा करून चांगल्या ठिकाणी हक्काचे घर मिळवून दिले.कोरोना काळात घरोघरी जाऊन ज्या ज्या गोष्टीची लोकांना आवश्यकता होती त्या सर्व गोष्टी त्यांनी स्वतः जाऊन पुरवल्या. त्यांनी केडीएमसी मध्ये स्थायी समिती सदस्या म्हणून कामकाज केलेले आहे. त्यांनी त्यांच्या प्रभागात मेडिकल कॅम्प,शैक्षणिक कोर्स कॅम्प व रोजगार कॅम्प च्या माध्यमातून अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिलेले आहेत. त्यांच्या घरातील सदस्य व नातेवाईक हे सर्वजण प्रशासनात उच्च पदावर वर्ग १ च्या पदावर असल्यामुळे शासकीय अडचणी येत असलेल्या बाबींचा तात्काळ निराकरण करण्याबरोबरच नागरिकांना त्यांच्या हक्काचा न्याय मिळवून देत असतात. त्या शिवसेना महिला उप शहर संघटक पदी कार्यरत असून त्यांना आदर्श नगरसेविका पुरस्कार हि मिळालेला आहे. त्यांनी आपल्या प्रभागासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून देखील फक्त जनसेवा हेच कर्म असा ध्यास धरून आज देखील त्यांच्या जवळ ना कोणती चारचाकी,ना मोठे घर आहे. त्या त्यांच्या वडिलोपार्जित चाळीतील वन रूमच्या खोलीत वास्तव्यास आहेत.त्यांच्याकडे ना कोणता मोठा बँक बॅलन्स आहे ना कोणती मोठी संपत्ती.जनसेवा हीच संपत्ती हाच हर्षाली थविल यांचा ध्यास आहे. शहराचे प्रथम नागरिक म्हणून महापौर पद हे खूप मोठे व महत्वाचे पद आहे. त्यात त्यांना विविध समित्यांचे अध्यक्ष पद भूषवावे लागते. प्रशासन व लोकसेवक यांच्या मध्ये समनव्य ठेवावे लागते. महत्वाचे म्हणजे काही गोष्टींमध्ये तात्काळ निर्णय घ्यावे लागतात. सर्व प्रशासकीय कामकाजावर बारीक लक्ष ठेवावे लागते. त्यासाठी अनुभवा बरोबरच या सर्व गोष्टी समजून घेण्यासाठी नविन माणसासाठी कमीत कमी एक वर्षाचा कालावधी लागतो.वरील सर्व गोष्टी पाहता ऍड.हर्षाली थविल या सर्वच बाजूंनी उजव्या ठरत आहेत. त्यांच्या अनुभवाचा फायदा शहराच्या विकासासाठी नक्की होईल. तर किरण भांगले हे पहिल्यांदाच नगरसेवक पदी निवडून आलेल्या आहेत. त्यांना प्रथम नगरसेवक म्हणून आपल्या कार्याचा ठसा उमटावने गरजेचे आहे आणि ते करतीलही यात काही वावगे नाही. परंतु सध्या मागील पाच वर्षांपासून निवडणुका लांबल्यामुळे शहराची बरीच विकास कामे रखडून राहिलेली आहेत. त्यामुळे नविन चेहरा देणे म्हणजे पुन्हा मागे पडल्या सारखे होईल तरी अनुभवाच्या जोरावर ऍड हर्षाली थवील यांची महापौर पदी निवड केली पाहिजे असे सर्व सामान्य नागरिकांतून बोलले जात आहे.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement