• Total Visitor ( 427848 )
News photo

ऐश्वर्यची विश्वविक्रमाची बरोबरी; जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत रुपेरी यश!

Raju tapal November 13, 2025 71

ऐश्वर्यची विश्वविक्रमाची बरोबरी; जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत रुपेरी यश!



भारताचा रायफल नेमबाज ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर याने ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पात्रता फेरीत जागतिक विक्रमाशी बरोबरी साधली. मात्र,अंतिम फेरीत त्याला अखेरीस रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. भारताचा ऑलिम्पिक पदकविजेता स्वप्निल कुसाळे अपयशी ठरत असतानाच ऐश्वर्यने मात्र पात्रता फेरीतच ५९७ गुणांचा वेध घेताना जागतिक विक्रमाची बरोबरी साधली आणि अंतिम विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रताही सिद्ध केली. भारताचा नीरज कुमारही ५९२ गुणांसह अंतिम फेरीसाठी पात्र ठरला. कुसाळे मात्र पात्रता फेरीतच ४४व्या स्थानावर राहिला. अंतिम फेरीत ऐश्वर्यने ४६६.९ गुणांचा वेध घेताना दुसरे स्थान मिळवले. चीनच्या युकुन लियू याने ४६७.१ गुणांसह सुवर्णपदक पटकावले. फ्रान्सचा औफ्रेरे ४५४.८ गुणांसह कांस्यपदकाचा मानकरी ठरला. अंतिम फेरी गाठणारा भारताचा दुसरा नेमबाज नीरज कुमार ४३२.६ गुणांसह पाचव्या स्थानावर राहिला. सम्राट-ईशाला मिश्र प्रकारात रौप्य वैयक्तिक सुवर्णपदक पटकावणाऱ्या सम्राट राणा याने सलग दुसऱ्या दिवशी १० मीटर पिस्तूल प्रकारात जागतिक पदकाची कमाई केली. सम्राटने ईशा सिंगसह १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात मिश्र सांघिक प्रकारात रौप्यपदक मिळविले. अंतिम फेरीत सम्राट-ईशाला चीनच्या क्विआनशुन याओ आणि कई हू जोडीविरुद्ध १०-१६ असा पराभव पत्करावा लागला. पात्रता फेरीत भारतीय जोडीने ५८६ गुणांसह अव्वल स्थान पटकावले होते. सुरुची सिंह आणि शर्वण कुमार ही दुसरी जोडी अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकली नाही. त्यांना ५७९ गुणच मिळवता आले.



 



 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement