• Total Visitor ( 695427 )
News photo

अलंकापुरीत इंद्रायणी नदीला जल प्रदूषणाचा विळखा...इंद्रायणी नदी फेसाळल्याने संताप

Raju Tapal publisher July 05, 2026 86

अलंकापुरीत इंद्रायणी नदीला जल प्रदूषणाचा विळखा...इंद्रायणी नदी फेसाळल्याने संताप



जलपर्णी वाहू लागली...ठेकेदाराचा देयक मागणीचा मार्ग मोकळा...नागरिकांत नाराजी



पिंपवड महापालिकेसह जिल्हा प्रशासनाचे जल प्रदूषण रोखण्यास अपयश    



आळंदी (गौतम पाटोळे):-येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पवित्र इंद्रायणी नदीला वाढत्या अस्वच्छतेने,नदीतील जल प्रदूषणाने,जलपर्णीच्या विळख्याने अपवित्रतेचे ग्रहण लागले आहे. जल प्रदूषणासह जलपर्णीचा विळखा इंद्रायणी नदीला कायम आहे. मात्र वाढत्या पावसाच्या पाण्याने जलपर्णी आणि फेसाळलेले पाणी फेसासह परिसरात वाऱ्याने इंद्रायणी नदीवर फेस तरंगत आणि जलपर्णी पाण्याचे प्रवाहात वाहून जात आहे. आळंदीसह इंद्रायणी नदीवर ठिकठिकाणी जलपर्णी समस्यां जैसे थे आहे. केवळ जलपर्णी पुढे ढकलून ठेकेदार मोकळे होत असून जलपर्णी समस्यां नसून जलपर्णी हि पाणी प्रदूषण वाढल्याचा इंडीकेटर आहे. पिंपरी चिंचवड महानगरपरिषद हद्दीतून थेट रसायन व मैला मिश्रित सांडपाणी नदीत सोडले जात असल्याने नदी पांढऱ्या फेसाने पुन्हा फेसाळली. यात केमिकल,रसायन मिश्रित,सांडपाणी थेट सोडले जात असल्याने भाविक, नागरिकांत नाराजीचा सूर उमटत आहे. चार दिवसांवर येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान येऊन ठेपले असताना हि इंद्रायणी नदी परिसर अस्वच्छ असल्याने आळंदी देहू परिसर विकासाची शोकांतिका उघड झाल्याची चर्चा भाविकांतून होत आहे. आळंदीतील इंद्रायणी नदीत जलपर्णी ची समस्यां देखील कायम असून आळंदीत सुरु होत असलेल्या प्रस्थान सोहळ्यातील हरिनाम सप्ताहाचे अनुषंगाने प्रभावी स्वच्छता,उपाय योजनेकडे दुर्लक्ष होत असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांचे कामकाजावर तसेच राज्य शासनाचे धोरणावर भाविक ताशेरे ओढत आहेत. इंद्रायणी घाटाची तोडफोड करून घाटाची विद्रुपता वाढवली असून वारकरी देखील यावर नाराजी व्यक्त करीत आहेत. मात्र याकडे शासनाची डोळेझाक होत आहे. इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त साठी विविध सेवाभावी संस्थानी केलेले पाठपुरावा या मुळे शासनाचे लक्ष वेधले गेले. मात्र जलप्रदूषण रोखण्यासाठी चे उपाय योजना तोकड्या पडल्या आहेत. सिमेंटीकरण घाट विकासावर शासनाने लक्ष केंद्रित करून प्राधान्याने जलप्रदूषण रोखण्याचे उपाय योजना हाती घेण्याकडे दुर्लक्ष केल्याची भावना जोग महाराज प्रासादिक दिंडीचे मार्गदर्शक हभप विचारसागर महाराज लाहुडकर यांनी सांगितले. इंद्रायणी नदीचे जलप्रदूषण वाढल्याने भाविक,वारकरी आणि नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. पिंपवड महापालिका आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अंकुश प्रदूषण करणाऱ्या घटकांवर राहिला नसल्याने वारंवार नदी पांढऱ्या शुभ्र प्रदुषित पाण्याने फेसाळत असल्याचे दिसत आहे. आळंदीत इंद्रायणी नदीतून नगरपरिषदेच्या पाणी साठवण बंधाऱ्यात प्रचंड प्रदूषित पाणी,जलपर्णीसह महापालिका हद्दीतून येत आहे. इंद्रायणी नदीवरील पाणी साठवण बंधारा अनेक ठिकाणी दगड निखळले आहेत. यामुळे गळती असून सद्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न निकाली निघाला असला तरी नदीचे वाढते प्रदूषण तीर्थक्षेत्र विकासाची शोकांतिका उघड करीत आहे. देखभाल दुरुस्ती अभावी नदी वरील भक्त पुंडलिक मंदिर परिसरात पाणी साठविण्यावर बंधारा गळतीने मर्यादा आली आहे. येथील बंधा-यासह कोल्हापूर पद्धतीचे बंधा-याचे गळती रोखण्यासह पाणी पुरवठा केंद्राकडील बंधाऱ्याची देखभाल दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून इंद्रायणी नदीचे वाढते प्रदूषण रोखण्याची उपाययोजना करण्याचे मागणीसह नदी प्रदूषण रोखण्याची मागणी देहू रानजाई प्रकल्पाचे प्रमुख सोमनाथ आबा,नमामि इंद्रायणी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, आळंदी जनहित फाउंडेशन अध्यक्ष राजेंद्र घुंडरे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे केली आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,सुनेत्राताई पवार यांना निवेदने देऊन केली आहे. मात्र पुणे जिल्हा प्रशासनाचे नदी प्रदूषण रोखण्याचे उपाय योजनांकडे दुर्लक्ष होत असल्याने नदी प्रदूषणाची पातळी हि खूप वाढली आहे. पिंपरी महापालिकेने इंद्रायणी नदीतील जलपर्णी काढण्याचे काम अगदी संथ झाले. आता पाऊस सुरु झाल्याने महापालिका हद्दीतील जलपर्णी पावसाचे पाण्यात वाहून येत आहे. पालखी सोहळ्याचे गांभीर्य लक्षांत घेऊन तसेच तीर्थक्षेत्राचे महत्त्व लक्षांत घेऊन विकास कामे गतीने होणे आवश्यक असल्याने याकडे दुर्लक्ष होत आहे. आळंदी स्मशान भूमी परिसरातील नदीत मोठ्या प्रमाणात राडा रोडा, जलपर्णी वाहून आली आहे. परिसरातील नागरिकांना डासांचे त्रासाने गैरसोयीस सामोरे जावे लागत आहे. येथे नदीत राडा रोडा साचल्याने तसेच नदीत मोठ्या प्रमाणात राडा रोडा टाकला जात असल्याने नदीचे पात्र उधळ झाले असून गवताचे प्रमाण वाढले आहे. घाटाचे विकसित ठिकाणी सांडपाणी नाली टाकण्यासाठी इंद्रायणी नदी घाटाची तोडफोड करण्यात आली असून घाटाचे विद्रुपीकरण झाल्याने अनेकांनी प्रशासनाचे कामात नियोजनाचा अभावाने नाराजी व्यक्त केली. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्षाने नदी प्रदूषण वाढले महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्षाने इंद्रायणी नदीचे प्रदूषणात वाढ झाली आहे. नदीतील जलप्रदूषित करणाऱ्या घटकावर गुन्हे दाखल करून कारवाई अभावी नदी प्रदूषण परिसरात वाढले आहे. आळंदीला पाणी पुरवठा केंद्रात येणारे पाणी देखील प्रचंड प्रदूषित झाल्याने आळंदी नगरपरिषदेस अखेर भामा आसखेडच्या पाण्याची मागणी करून शुद्धीकरणावर यंत्रणेवरील ताण कमी करावा लागला. पर्यायी सांडपाणी नलिका असताना २ फूट पाईप लाईन टाकण्यासाठी इंद्रायणी नदी घाटावर तोडफोड करण्यात आली. मात्र पूर्ववत घाटाचे दर्जेदार काम होत नसल्याने घाटाचे वैभव पूर्ववत करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. तत्काळीन बांधकाम अभियंता सचिन गायकवाड यांनी पूर्ववत घाटाचे होईल अशी ग्वाही देऊन देखील विकास कामे मार्गी न लागल्याने भाविकांतून नाराजीचा सूर उमटत आहे. आळंदी नगरपरिषदेच्या माध्यमातून विकास कामे सुरु असल्याचे मुख्याधिकारी माधव खांडेकर म्हणाले,मात्र पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतून थेट सांडपाणी आणि जलपर्णी पावसाचे पाण्यात वाहून येत आहे. आळंदी येथील घाटावर कामगार लावून जलपर्णी हटविण्याचे काम सुरु असल्याचे सांगितले.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026