• Total Visitor ( 695537 )
News photo

विश्वकर्मा संरक्षण कामगार सहकारी पतसंस्था मर्यादित पुणे चेअरमन पदी बाळासाहेब मुंगसे पाटील यांची बिनविरोध निवड

Raju Tapal publisher August 31, 2026 30

विश्वकर्मा संरक्षण कामगार सहकारी पतसंस्था मर्यादित पुणे चेअरमन पदी बाळासाहेब मुंगसे पाटील

यांची बिनविरोध निवड



आळंदी ( गौतम पाटोळे ) :-विश्वकर्मा संरक्षण कामगार सहकारी पतसंस्था मर्यादित पुणे या संस्थेचे चेअरमन पदी बाळासाहेब मुंगसे यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्रीमती नूतन भोसले यांनी कामकाज पाहिले. या संस्थेत एकूण २१ संचालक व दोन तज्ञ संचालक असे २३ मान्यवरांचे मंडळ आहे. चेअरमन पदी बाळासाहेब मुंगसे पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती नूतन भोसले यांनी केली. निवडी नंतर मुंगसे पाटील यांच्या निवडीचे जोरदार स्वागत करून अभिनंदनाचा वर्षाव तसेच संस्थे तर्फे सत्कार करण्यात आला. आळंदी, केळगाव पंचक्रोशीतील विविध संस्था,पदाधिकारी यांचे तर्फे अभिनंदन करण्यात आले. आळंदी SDV10 ग्रुप तर्फे अर्जुन मेदनकर यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026