भातकुली पंचायत समिती तालुकास्तरीय क्रीडा महोत्सव १० व ११ जानेवारीला
सुमारे ७०० विद्यार्थी व शिक्षक सहभागी होणार
सांघिक खेळासह वैयक्तिक खेळांचा समावेश
भातकुली, दि.८: भातकुली पंचायत समिती अंतर्गत तालुकास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे दिनांक १० व ११ जानेवारीला सायत येथील संत गाडगेबाबा विद्यालयाच्या मैदानावर आयोजन करण्यात आले आहे.
दोन दिवसीय क्रीडा महोत्सवाचे उदघाटन आमदार रवी राणा यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमदार राजेश वानखडे यांची उपस्थिती राहणार आहे. विशेष अतिथी म्हणून सरपंच अन्नपूर्णा मानकर, उपसरपंच विशाल भट्टड यांची राहणार आहे.
प्रमुख उपस्थिती गटविकास अधिकारी प्रविण वानखेडे, संस्थेचे सचिव अशोक चव्हाण, शा. व्य. समितीचे अध्यक्ष ब्रिजमोहन भट्टड, मंगेश मोहोड, गणेश कावरे, नुजरत अफरोज नासिर शहा, मुख्याध्यापिका पुष्पा रामावत, पोलिस पाटील अशोक राऊत यांची राहणार आहे.
या क्रीडा महोत्सवात सुमारे ७०० खेळाडू व खेळ शिक्षक सहभागी होणार आहे. यादरम्यान खेळाडूंना अल्पोपहार व जेवणाचीदेखील सोय करण्यात आली आहे.
बक्षीस वितरण ११ जानेवारीला गटविकास अधिकारी प्रविण वानखेडे यांचे हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी सरपंच अन्नपूर्णा मानकर राहणार आहे. तर प्रमुख उपस्थिती उपसरपंच विशाल भट्टड, शा. व्य. समितीचे अध्यक्ष मंगेश मोहोड यांची राहणार आहे.
या क्रीडा महोत्सवात विद्यार्थी, खेळाडूसह खेळ शिक्षकांनी सहभागी होण्याचे आवाहन गटशिक्षणाधिकारी दिपक कोकतरे, अधिक्षक नरेंद्र गायकवाड, शिक्षण विस्तार अधिकारी संतोष घुगे, शकील अहमद खा, पंजाबराव पवार, केंद्रप्रमुख सुनिल पांडे, नीता सोमवंशी, जानराव सुलताने, किशोर रुपणारायन, उमेश चुनकीकर, रविंद्र धरमठोक, नरेंद्र धनस्कर, शैलेश दहातोंडे, मुख्याध्यापिका रंजना पुनकर यांच्यासह मुख्याध्यापक, शिक्षक, विषय साधन व्यक्ती, विशेष शिक्षक यांनी केले आहे.असे क्रिडा महोत्सवाचे प्रसिद्धीप्रमुख राजेश सावरकर कळविले आहे.
या क्रीडा महोत्सवात प्राथमिक विभाग सांघिक खेळात कबड्डी, खो-खो, वैयक्तिक खेळात लंगडी, ७५ मी.धावणे, लांब व उंच उडी, दोरीवरील उड्या याचा समावेश असुन माध्यमिक विभाग सांघिक खेळात कबड्डी, खो-खो, व्हाॅलीबाॅल, टेनिक्वाइड, दुहेरी, बॅडमिंटन दुहेरी, १००x४ रिले, वैयक्तीक खेळात १०० मी. धावणे, लांब व उंच उडी, कुस्ती, गोळा फेक, टेनिक्वाइड मुली या सांघिक व वैयक्तिक खेळाचा समावेश आहे.
यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम व निर्दशने सादर होणार आहे.