• Total Visitor ( 695431 )
News photo

भातकुली तालुका विज्ञान प्रदर्शन संपन्न पंजाबराव कुचे विद्यालय विर्शी येथे २७ व २८नोव्हेंबरला आयोजन संपन्न 

Raju tapal December 01, 2025 78

भातकुली तालुका विज्ञान प्रदर्शन संपन्न पंजाबराव कुचे विद्यालय विर्शी येथे २७ व २८नोव्हेंबरला आयोजन संपन्न 



भातकुली/अमरावती-तालुका विज्ञान मंडळ व शिक्षण विभाग पंचायत समिती भातकुली यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन स्व.पंजाबराव कुचे विद्यालय विर्शी येथे २७ ला उद्घाटन गटशिक्षणाधिकारी  रामेश्वर  माळवे यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे गोपाल वडतकर अध्यक्ष भातकुली तालुका  विज्ञान मंडळ,भिमराव कावरे,गजाननराव देशमुख,कुचे साहेब,विषय साधन व्यक्ती सतिश वानखेडे पं.स.भातकुली होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रज्ञा देशमुख  मुख्याध्यापक ह्या होत्या.अतिशय चांगले नियोजन केल्याबद्दल  विद्यालयाचे व मंडळाचे गट शिक्षणाधिकारी साहेब यांनी भरभरून कौतुक केले. २८ ला  समारोपिय कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाचे अध्यक्ष  हरिभाऊ मोहोड हे होते प्रमुख अतिथी प्रिया देशमुख मॅडम  शिक्षणाधिकारी माध्यमिक जि प अमरावती  शिरभाते मँडम उपशिक्षणाधिकारी जि प  ह्या होत्या, दिलीपराव कडु अध्यक्ष राज्य शिक्षक संघ,मधुकरराव रोडे सर,तसेच  गजाननराव देशमुख,गजाननराव मानकर,गोपाल वडतकर,श्रीकांत कडु अध्यक्ष जिल्हा विज्ञान मंडळ,खरड पोलिस पाटील,मुख्याध्यापक देशमुख मँडम,प्रफुल्ल खोपे,उपस्थित होते.यावेळी सहभागी विद्यार्थांना व प्रथम,व्दीतीय आणि तृतिय क्रमांक आलेल्या प्रतिकृतीला तयार केलेल्या विद्यार्थांना प्रमाणपञ आणि स्मृतीचिन्ह देण्यात आले.यावेळी विज्ञान मंडळ द्वारे घेण्यात येणाऱ्या ज्ञान विज्ञान स्पर्धा परीक्षा,प्रश्न मंजुषा,निबंध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.असे प्रसिध्दी प्रमुख राजेश सावरकर यांनी कळविले आहे.

बक्षिस वितरण

प्राथमिक विभाग मधुन Green Energy मध्ये 

शकाला विद्यामंदीर सायतचा अर्णव राऊत व स्वराली देशमुख यांचा प्रथम क्रमांक, Health and Hygene- आदर्श इंग्लिश काॅन्हेट भातकुलीची आराध्या मोहोड,राखी शिरसाट यांचा व्दितीय क्रमांक आणि कचर्‍याचे व्यवस्थापन मध्ये जि.प माध्यमिक शाळा कामनापुर चेअंशुमन खोब्रागडे,गुंजन फुटाने यांच्या प्रतिकृतीला तृतिय पुरस्कार मिळाला.

माध्यामिक विभाग- Air quality Device जनता हायस्कुल पूर्णानगर-अपूर्व बोबडे,श्रावणी कथे यांचा  प्रथम क्रमांक तर Naste ouctiez Marregement  आदर्श इंग्लीश काॅन्हेट भातकुलीचा गौरव वानखेडे,रुग्वेद-बोचे व्दीतीय dates Manegement मधुन शकाला विद्यामंदीर सायतचा मोहीत श्रीवास भक्ती दंदे यांना तृतिय क्रमांक मिळवला.

दिव्यांग ३०% (माध्यमिक)

पुरोगामी विदयालय,आसराची कु.श्रावणी चुनसकर

प्राथमिक शिक्षक मध्ये पुरोगामी विद्यालय आसराचे अशोकराव बोबडे तर माध्यमिक शिक्षक मध्ये

पंजाबराव कुचे विद्यालय,विर्शीचे संजय गेडाम प्रयोग शाळा परीचर मधुन

पंजाबराव कुचे विद्यालय,विर्शी शरद अंबादासराव मेहकरे यांच्या प्रतिकृतीची निवड झाली.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026