• Total Visitor ( 765602 )
News photo

पुलावरील कठड्याला धडकून कल्याणमधील दुचाकीस्वाराचा मृत्यू; मोहोळ तालुक्यातील घटना        

Raju tapal February 18, 2025 153

पुलावरील कठड्याला धडकून कल्याणमधील दुचाकीस्वाराचा मृत्यू; मोहोळ तालुक्यातील घटना        



शिरूर जि.पुणे :- पुलावरील कठड्याला धडकून तुळजापूरला देवदर्शनासाठी जात असलेल्या कल्याणमधील दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.

सुरेश थेरू चेल्लम रा‌.कल्याण जि.ठाणे असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव असून शनिवार दि.१५ फेब्रुवारीला सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना मोहोळ तालुक्यातील (जि.सोलापूर) पेनूर पालखी मार्गावर घडली.

या अपघाता बाबत समजलेल्या माहितीनूसार,सुरेश चेल्लम हे एम एन ०५ एफ एफ ८०९१ या क्रमांकाच्या दुचाकीवरून शनिवारी पहाटे श्री.क्षेत्र तुळजापूरला दर्शनासाठी निघाले होते.त्यांच्याबरोबर त्यांचे तीन मित्र आपापल्या दुचाकीवरून चालले होते. सुरेश चेल्लम हे आपल्या मित्रांपेक्षा भरधाव वेगात दुचाकीवरून लोणावळा ,शिरवळ ( जि.सातारा ), फलटण, पंढरपूर ( जि.सोलापूर ) मार्गे मोहोळ तालुक्यातील पेनूर येथील पुलावर आले. त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने त्यांची दुचाकी सिमेंटच्या कठड्याला धडकली.या अपघातात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना तात्काळ मोहोळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

             


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement