स्वातंत्र्य सैनिक रायकुमार बी .गुजर प्रशालेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी साजरी
शिरूर (प्रतिनिधी: विजय ढमढेरे):- तळेगाव ढमढेरे येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वातंत्र्य सैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेत संस्थेचे संचालक व विद्या सहकारी बँकेचे संचालक महेशबापू ढमढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी वर्गशिक्षक गौतम जाधव यांच्या सहयोगाने कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सुनीता पिंगळे,पर्यवेक्षक मोहन ओमासे यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सान्वी पाटील,सिद्धी हिंगसे,दुर्वा सायकर या विद्यार्थीनींनी केले. यावेळी,ईश्वरी विधाते,अलमीरा सोलापूरे,भराटे अर्पित,मल्हार जाधव या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतामधून लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या कार्याचा आढावा घेतला. प्रशालेचे उपशिक्षक गौतम जाधव यांनी अण्णा भाऊ साठे यांचे कार्य आणि साहित्यिक योगदान व लोकमान्य टिळक यांचे कार्य याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक अशोकराव दहिफळे,उपमुख्याध्यापिका सुनीता पिंगळे,पर्यवेक्षक मोहन ओमासे,प्रशालेतील शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष कौस्तुभकुमार गुजर,उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते, सचिव अरविंददादा ढमढेरे, जेष्ठ संचालक विजयराव ढमढेरे,संचालक महेशबापू ढमढेरे,यांनी सदिच्छा व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.