• Total Visitor ( 765652 )
News photo

स्वातंत्र्य सैनिक रायकुमार बी. गुजर प्रशालेत प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे जयंती उत्साहात साजरी

Raju Tapal publisher September 18, 2026 137

स्वातंत्र्य सैनिक रायकुमार बी. गुजर प्रशालेत प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे जयंती उत्साहात साजरी



शिरूर:- तळेगाव ढमढेरे  येथील स्वातंत्र्य सैनिक रायकुमार बी. गुजर प्रशालेत गुरुवार दिनांक १७ सप्टेंबर २०२६ रोजी साहित्यिक,पत्रकार,प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांची जयंती विद्या सहकारी बँकेचे संचालक महेशबापू ढमढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांना प्रबोधनकार ठाकरे यांच्या सामाजिक कार्याची,साहित्यिक योगदानाची तसेच पुरोगामी विचारांची ओळख व्हावी,या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रशालेचे उपशिक्षक चंद्रशेखर सातपुते यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे तसेच विद्या सहकारी बँकेचे संचालक महेशबापू ढमढेरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक अशोक दहिफळे,उपमुख्याध्यापिका सुनीता पिंगळे,पर्यवेक्षक रवींद्र सातपुते हे त्याचप्रमाणे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.शिक्षक व विद्यार्थ्यांनी प्रबोधनकार ठाकरे यांना अभिवादन केले. याप्रसंगी प्रशालेच्या उपशिक्षिका निशा शितोळे यांनी प्रबोधनकार ठाकरे यांची कविता विद्यार्थ्यांसमोर प्रभावीपणे सादर केली. त्यांच्या काव्यसादरीकरणातून प्रबोधनकारांच्या विचारांची व सामाजिक जाणिवेची विद्यार्थ्यांना ओळख झाली. तसेच विद्यार्थ्यांमधून प्रगती माळगे आणि कार्तिक निंबाळकर यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या जीवनकार्यावर व विचारांवर प्रकाश टाकत त्यांच्या सामाजिक प्रबोधनाच्या कार्याला उजाळा दिला. त्यांच्या मनोगतातून विद्यार्थ्यांनी प्रबोधनकारांच्या विचारांचा आजच्या काळातील संदर्भ समजून घेण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेचे उपशिक्षक सुरेंद्र ठुबे यांनी केले,तर शिक्षिका अलका सातपुते यांनी उपस्थितांचे आभार मानले. शिक्षकांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना थोर समाजसुधारकांच्या विचारांची ओळख करून देत कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव ढमढेरे चे अध्यक्ष कौस्तुभ कुमार गुजर,मानद सचिव अरविंददादा ढमढेरे,उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते,ज्येष्ठ संचालक विजयराव ढमढेरे यांनी सदिच्छा व्यक्त करून कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement