• Total Visitor ( 723046 )
News photo

स्वातंत्र्य सैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेत आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांची जयंती साजरी

Raju Tapal publisher September 07, 2026 385

स्वातंत्र्य सैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेत आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांची जयंती साजरी

     

शिरूर (प्रतिनिधी):- शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वातंत्र्य सैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेत संस्थेचे संचालक,विद्या सहकारी बँकेचे संचालक महेशबापू ढमढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली. विद्या सहकारी बँकेचे संचालक महेशबापू ढमढेरे यांच्या हस्ते आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आला. यावेळी इयत्ता सातवीतील सुमित बनकर आणि अनुष्का शितोळे यांनी उमाजी नाईक यांच्या कार्याच्या आढावा आपल्या मनोगतामधून घेतला. प्रशालेच्या उपशिक्षिका अलका सातपुते यांनी आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांचे कार्य आणि ब्रिटिश सरकारविरोधात त्यांनी उभारलेला लढा याविषयी मुलांना मार्गदर्शन केले. विद्या सहकारी बँकेचे संचालक महेशबापू ढमढेरे यांनी आपल्या मनोगतातून आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांच्या व्यक्तिमत्त्वातील शौर्य,स्वाभिमान आणि स्वातंत्र्याची प्रेरणा या गुणांचा आदर्श मुलांनी घेतला पाहिजे असे विचार यावेळी व्यक्त केले. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक अशोकराव दहिफळे,उपमुख्याध्यापिका सुनीता पिंगळे,प्रभारी पर्यवेक्षक रवींद्र सातपुते,सुरेंद्र सातपुते प्रशालेतील शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.कुंडलिक कदम यांनी केले. आभार रवींद्र सातपुते यांनी मानले. इयत्ता सातवीचे वर्गशिक्षक जयवंत कोकरे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. या कार्यक्रमासाठी  संस्थेचे अध्यक्ष कौस्तुभकुमार गुजर,उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते,सचिव अरविंददादा ढमढेरे,जेष्ठ संचालक विजयराव ढमढेरे,संचालक महेशबापू ढमढेरे,

 यांनी सदिच्छा व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.

       


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement