संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचा वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबिर
विविध उपक्रमांचे आयोजन उत्साहात;माऊली मंदिरात पूजा
आळंदी ( गौतम पाटोळे ):- मराठा समाजभूषण संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त सकल मराठा समाज आळंदी शहर,आळंदी पंचक्रोशी यांच्या वतीने श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिरात श्रींचे चलपादुका अभिषेख,पूजा,श्रींचे दर्शन,पसायदान वेदमंत्र जयघोषात श्रींची पूजा करण्यात आली. श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरातील पुरातन श्री गणेश मंदिरात श्रींचे चल पादुका पूजा माजी विरोधी पक्ष गटनेते डी.डी.भोसले पाटील,अरुण कुरे,अर्जुन मेदनकर. बाबासाहेब भंडारे,उत्तम भोसले,भागवत शेजूळ,राम कदम ,गोवर्धन जंगले यांचे हस्ते झाली. आळंदी येथील ज्ञानदर्शन धर्मशाळेत सलग तिसऱ्या वर्षी महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक बांधिलकीतून रक्तदान शिबिराचे आयोजन उत्साहात करण्यात आले. यावेळी 145 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यात 10 महिलांनी ही सहभाग घेतला. आळंदी शहर व पंचक्रोशीतील युवक,सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रक्तदान शिबिराचा प्रारंभ संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचे समवेत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून करण्यात आला. दादांचे हस्ते ऑनलाईन पद्धतीने शिबिराचे उद्घाटन झाले. या वेळी माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे पाटील, जालिंदर महाराज भोसले,शिबिरास पुणे जिल्हा परिषद सदस्या विनयाताई सुधीर मुंगसे,मी सेवेकरी सोशल फाउंडेशन चे अध्यक्ष सुधिरभाऊ मुंगसे,अजित घुंडरे,माजी नगरसेवक पांडुरंग वहिले,भाजपचे सरचिटणीस किरण येळवंडे,शिवसेना शहर प्रमुख राहुल चव्हाण,नगरसेवक सुरेशनाना झोंबाडे,अरुण कुरे पाटील, अर्जुन मेदनकर, भागवत शेजुळ, बालाजी शिंदे रमाकांत शिंदे, शशिकांत राजेजाधव, जयसिंग कदम, राम कदम, दत्ता फराटे,मंगेश लटके,बालाजी ब्लड बँक साताराचे महेशकुमार भोसले,नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, उपाध्यक्षा सुजाताताई तापकीर, गटनेते रामदास भोसले, दिनेश घुले, सोमनाथ कुऱ्हाडे, वैजयंता उमरगेकर, विजय तापकीर, मंगेश काळे,आजी माजी नगरसेवक,सामाजिक कार्यकर्ते,पदाधिकारी,विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमा दरम्यान लोकशाहीर अण्णाभाऊ साठे त्यांचे जयंती दिनी तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिधी निमित्त समाज प्रबोधन व राष्ट्रनिर्मितीतील कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेण्यात आला. तसेच संघर्ष योद्धा मनोजभाऊ जरांगे-पाटील यांनी समाजाच्या न्यायहक्कांसाठी सातत्याने दिलेल्या लढ्याचा आढावा विविध मान्यवरांनी रक्तदान करून समाजसेवेची प्रेरणा प्रत्येक तरुणाने कृतीतून जपली. आळंदी परिसरातील समाज बांधव आणि सेवकांनी रातदान शिबिरास भेट देऊन सद्दिच्छा दिल्या. यात महादेव पाखरे,अर्जुन मेदनकर,विलास काटे,भानुदास पहाड,अनिल जोगदंड,जयसिंह कदम,बालाजी शिंदे,रमाकांत शिंदे,दिनेश कुऱ्हाडे,विठ्ठल शिंदे यांचेसह अनेकांनी सामाजिक बांधिलकी जोपासली. पुणे जिल्हा परिषद विनया सुधीर भाऊ मुंगसे,मी सेवेकरी सोशल फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष सुधीरभाऊ मुंगसे यांचे विशेष सहकार्यव मार्गदर्शन मिळाले. शिबीर यशस्वी करण्यास संयोजन युवा नेते अरुण कुरे,भागवत शेजूळ,अर्जुन मेदनकर,जयसिंह कदम,शशिकांत जाधव,दत्त फराटे,बालाजी शिंदे रमाकांत शिंदे आदींनी परिश्रम घेतले. आळंदी येथील ज्ञानदर्शन धर्मशाळेत आयोजित वारकरी सांप्रदायिक प्रशिक्षण शिबिर ,ग्रामदैवत श्री हजेरी मारुती मंदिरात श्रींची आरती महाप्रसाद,फळ वाटप तसेच लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचे जयंती निमित्त पाणी,फळ वाटप करण्यात आले. या वेळी रक्तदानाचे महत्त्व आणि युवकांनी सामाजिक बांधिलकी जपत उपक्रमांत सहभागी होण्यास संदेश दिला. शिबिरामध्ये अनेक युवकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडली.