• Total Visitor ( 385179 )
News photo

अकोला जिल्ह्यातील काँग्रेसचे खंबीर नेतृत्व आणि प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांची निर्घृण हत्या

Raju tapal January 07, 2026 24

अकोला जिल्ह्यातील काँग्रेसचे खंबीर नेतृत्व आणि प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांची निर्घृण हत्या



अकोला :-  जिल्ह्यातील राजकारणातून एक अत्यंत धक्कादायक आणि सुन्न करणारी बातमी समोर आली आहे. अकोला जिल्ह्यातील काँग्रेसचे खंबीर नेतृत्व आणि प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. हिदायत पटेल यांच्यावर आकोट तालुक्यातील मोहाळा गावी जीवघेणा हल्ला करण्यात आला होता.

एका माथेफिरूने पटेल यांच्यावर चाकूने सपासप वार केले. हल्ल्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण अकोला जिल्ह्यात तणावपूर्ण शांतता पसरली असून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आरोपींमध्ये अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल हल्ला प्रकरणातील आरोपींमध्ये अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद बुद्रूजम्मा,अकोटचे माजी काँग्रेस नगराध्यक्ष संजय बोडखे आणि काँग्रेस नेते अन् जिल्हा परिषदेचे माजी सभापती राजीव बोचे यांच्या नावाचा समावेश आहे. अकोट ग्रामीण पोलिसांत 5 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हिदायत पटेल यांचा मृत्यू झाल्यानंतर खुनाचे गुन्हे दाखल होतात का?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement