• Total Visitor ( 385202 )
News photo

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ

Raju tapal January 03, 2026 368

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ

राजू टपाल. 

टिटवाळा :- कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी टिटवाळा,मांडा,अटाळी या पॅनल क्रमांक ३ मधील लोकप्रिय उमेदवार प्रदीप सुरेश भोईर,सुषमा विशाल पाटील,ज्योती तुषार आभाळे(कडाळी),भूषण बाळाराम जाधव या उमेदवारांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ स्वर्गवासी आनंद दिघे मार्ग येथील अजिंक्य शिवसेना शाखा येथून मोठ्या जल्लोषात केला. या वेळी शिवसेना मनसेचे अनेक पदाधिकारी,कार्यकर्ते,महिला उपस्तिथ होत्या. सर्व प्रथम चार ही उमेदवारांनी टिटवाळा येथील श्री.सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले. तसेच आपल्या जाहीरनाम्याची प्रत गणरायाच्या चरणी अर्पण केली. त्यानंतर जवळच असलेल्या विठ्ठल रुख्मिणी मंदिरात जाऊन हि दर्शन घेऊन जाहीरनाम्याची प्रत वाहिली. शिवसेनेकडून पॅनल क्रमांक ३(ड) मधून प्रदीप सुरेश भोईर,सुषमा विशाल पाटील या मशाल चिन्हावर निवडणूक लढवत आहे तर मनसेचे भूषण बाळाराम जाधव हे पॅनल क्रमांक ३(अ) तर ज्योती तुषार आभाळे (कडाळी) हे रेल्वे इंजिन या चिन्हाद्वारे निवडणूक लढवीत आहेत. भूषण बाळाराम जाधव यांनी आपल्या जाहीरनाम्यात जनतेच्या प्रश्नांसाठी सुशिक्षित नेतृत्व तर ज्योती तुषार आभाळे(कडाळी) यांनी एक प्रभावी पदवीधर  उमेदवार तर प्रदीप सुरेश भोईर,सुषमा विशाल पाटील यांनी आपआपल्या जाहीरनाम्यात मुद्देसूद प्रश्न मांडून नागरिकांच्या दैंनदिन गरजेच्या व महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष वेधले आहे. सदर प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कल्याण पश्चिम विधानसभा संघटक किशोरभाई शुक्ला,माजी नगरसेवक सुरेश भोईर,माजी नगरसेवक दशरथ तरे,मनसेचे कल्याण पश्चिम विधानसभा उपजिल्हाध्यक्ष दिनेश भोय,मिलिंद सावंत,दिलीप पातकर,हनुमान भोईर,धनंजय पाटील,युवासेनेचे प्रवीण भोईर उपविभाग प्रमुख दिलीप पाटकर,संभाजी मोरे,मनीष चौहान,गिरीश यशवंतराव,शिवसेना शाखाप्रमुख संतोष पवार,शिवसेना मनसेचे सर्व पदाधिकारी महिला आघाडी हजारो संख्येने महिला समर्थक उपस्थित होते.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement