• Total Visitor ( 765611 )

चाळीसगांव येथील चार वर्षीय अल्पवयीन चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा होण्याची मागणी

Raju Tapal December 08, 2021 142

चाळीसगांव येथील चार वर्षीय अल्पवयीन चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा होण्याची मागणी



अन्याय अत्याचार निर्मुलन समिती या सामाजिक संघटनेच्या वतिने

चाळीसगांव या ठीकाणी चार वर्षीय अल्पवयीन चिमुरडीवर  नराधम सावळाराम भानुदास शिंदे वय २६ याने अत्याचार करुन मानवतेला काळीमा फासण्याचा निंदनीय प्रकार केला असुन पीडित चिमुरडी उपचारार्थ रुग्णालयात दाखल असुन तिची प्रकृती गंभीर असून अशाप्रकारच्या राक्षसी कृत्य करणारया नालायकास फाशीची शिक्षा होण्यासाठी सदरचा खटला जलदगती न्यायालयात त्वरीत सुरु करावा व या खटल्यात विषेश सरकारी वकील यांची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी अन्याय अत्याचार निर्मुलन समिती चे प्रदेश अध्यक्ष रविंद्रदादा जाधव यांचे आदेशानुसार नासिक जिल्हा व मनमाड शहर कार्यकारिणीच्या वतिने निवेदन देत सदरील गंभीर प्रकरणाचा समिती तर्फे तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. 

सदरील वेळी  अन्याय आत्याचार निर्मूलन समितीचे 

जिल्हा युवक अध्यक्ष (पिंटू)विकास वाघ, सुरेखा ढाके,शिलाताई सांगळे,ज्योती ठाकूर.रोहिणी वाव्हळ.विजय सोनवणे. स्वराज वाघ.सोनाली निकम. ललिता जामधाडे.संगीता कांबळे.या सर्वांनी निवेदनाद्वारे आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement