डेप्युटी आरटीओ आशुतोष बारकुल यांच्यावर चौकशी करून कारवाई करण्याबाबत मुख्यमंत्री सचिवालयाचे आदेश!
कल्याण :- सर्वसामान्य नागरिकांना वाहना संबंधित विविध शासकीय सेवा घेण्यासाठी,वाहन नोंदणी,परवाना नूतनीकरण,नवीन परवाना, हस्तांतरण फिटनेस प्रमाणपत्र परवाना दुरुस्ती,कर भरणा इत्यादी कामांसाठी सर्वसामान्य नागरिक हे उपविधी प्रादेशिक कार्यालयाकडे उपप्रादेशिक कार्यालयाकडे जावे लागते. सदरच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये कार्यरत असलेले आशुतोष बारकुल यांच्या कामकाजामध्ये अनागोंदी कारभार मनमानी कारभार कर्तव्यातील दुर्लक्ष,दलालांचा हस्तक्षेप इत्यादी बाबी निदर्शनास येत आहेत असे राष्ट्रीय मानव हक्क मंचाचे अध्यक्ष शरद काशिनाथ धुमाळ यांनी आपल्या निवेदनात नमूद केल्यामुळे त्याची गंभीर दखल घेऊन मुख्यमंत्री सचिवालय कक्ष कोकण विभाग यांनी संबंधित परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य परिवहन आयुक्त कार्यालय मुंबई यांना आदेश निर्गमित करण्यात आले आहेत की, संबंधित उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांच्यासहित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. सदर प्रस्तावित कारवाईच्या आदेशामुळे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय कल्याण येथील जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कशी आणि कोणत्या स्वरूपात कारवाई होणार आहे याबाबत उलट सुलट चर्चा सुरू असून प्रशासनात एकच खळबळ माजली आहे.