• Total Visitor ( 765605 )
News photo

ट्रेलरच्या‌ चाकाखाली गेल्याने दुचाकीवरील कंपनी कामगाराचा जागीच मृत्यू          

Raju tapal July 15, 2025 118

ट्रेलरच्या‌ चाकाखाली गेल्याने दुचाकीवरील कंपनी कामगाराचा जागीच मृत्यू          



शिक्रापूर ( प्रतिनिधी) :- कंपनीत कामासाठी निघालेल्या दुचाकीवरील कामगाराचा ट्रेलरच्या‌ चाकाखाली गेल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना चाकण -तळेगाव दाभाडे रस्त्यावर खेड तालुक्यातील खालुंब्रे गावच्या हद्दीत घडली.

गजानन बाबुराव बोलकेकर वय -२७ वर्षे रा‌.येलवाडी ता‌.खेड जि.पुणे असे ट्रेलरच्या चाकाखाली गेल्याने मृत्युमुखी पडलेल्या कंपनी. कामगाराचे नाव आहे.

या अपघाताबाबत समजलेल्या माहितीनुसार,गजानन बाबुराव बोलकेकर हा कामगार चाकण औद्योगिक वसाहतीतील आॅटोकाॅम कार्पोरेशन पानसे प्रा.लिमिटेड या कंपनीत कामाला होता. दुचाकीवर पाठीमागे बसून तो तळेगाव दाभाडे बाजूकडून चाकण बाजूकडे येत होता. ट्रेलरही तळेगाव दाभाडे बाजूकडून चाकण बाजूकडे चालला होता.बोलकेकर हे एच आर एक्झिक्युटिव्ह म्हणून कंपनीत काम करत होते.तीन महिन्यांपूर्वीच १८ एप्रिलला त्यांचा विवाह झाला.ते मुळचे नांदेड जिल्ह्यातील बोळका येथील होते.

दुचाकीचालक जखमी असून त्याच्यावर चाकण येथील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

ट्रेलर चालकाला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे अशी माहिती म्हाळूंगे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांनी पत्रकारांना दिली.

         


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement