टिटवाळ्यातील जनसेवक दिपक भाऊ कांबळे पॅनल क्रमांक ३ मधून निवडणूक लढवणार
राजू टपाल.
टिटवाळा :- आरंभ नव्या पर्वाचा आपल्या हक्काचा जनसेवक सुशिक्षित विश्वासहार्य चेहरा म्हणून टिटवाळ्यातील जनसेवक दिपक भाऊ कांबळे पॅनल क्रमांक ३ मधून अनुसूचित जाती या आरक्षणामधून निवडणूक लढविणार आहे.
समाज कार्याची नेहमीच ओढ अंगात भिनलेली असल्याने तसेच आपल्या मितभाषी,स्मितहास्याने सर्व सामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यात पुढाकार घेत असलेले दीपक भाऊ कांबळे हे आपल्या हक्काचा माणूस म्हणून जनतेपुढे येत आहेत. त्यांनी टिटवाळा परिसरातील अनेक भागात विविध कामांचा आढावा घेतलेला असून यात प्रामुख्याने गरजू महिलांना सक्षम करण्यासाठी शिलाई मशीन वाटप तर काही भागात गरजू महिलाना भांडी वाटप असे उपक्रम राबविलेले आहेत. टिटवाळा परिसरातील काही भागातील रस्त्यांची झालेली दुरावस्था बघून रस्ते बनवण्यासाठी त्यांनी नेहमीच स्वतः पुढाकार घेतलेला आहे. ज्या ठिकाणी गाड्या जाण्यासाठी व नागरिकांना चालण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत होती अशा ठिकाणी तातडीने खडी टाकून नागरिकांना दिलासा दिलेला आहे. टिटवाळा परिसरातील काही आदिवासी पाड्यांत छत्र्या वाटप,गोरगरीब महिलांना साड्या वाटप,इंदिरा नगर भागातील पाणी टंचाईवर त्यांनी पाणी खात्याशी संपर्क साधून टँकर द्वारे पाणी पुरवठा करण्यास पुढाकार घेतला होता. तसेच तत्कालीन मंत्री कपिल पाटील,आमदार विश्वनाथ भोईर,माजी आमदार नरेंद्र पवार,केडीएमसी पाणी अभियंता यांना पत्रव्यवहार करून पाण्याची समस्या सोडविण्याची मागणी केली होती.
तसेच नवरात्र उत्सवामध्ये महिलांसाठी विविध प्रकारचे बक्षीसे आणि साड्या वाटप केले होते. तसेच काही सखल भागात पावसाळ्यात पुराचे पाणी शिरल्यामुळे स्वतः पाण्यात उभे राहून नागरिकांना रस्ता दाखवून त्यांना घरी जाण्यासाठी मदत केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसा निमित्त अनेक भागात मोफत आरोग्य शिबिरे,रक्तदान शिबिर,महिलांच्या विविध आरोग्य समस्या शिबीर अशा अनेक उपक्रमे त्यांनी राबविलेली आहे.
एक पेड मां के नाम हा उपक्रम तसेच हर घर घर तिरंगा अभियान राबविण्यासाठी विविध सोसायट्यामध्ये जाऊन तिरंगा ध्वज वाटप करून नागरिकांना ध्वजाचे महत्त्व विषद करून दिले होते. कांबळे यांनी अनेक ठिकाणी महापुरुष यांच्या जयंत्या मोठ्या प्रमाणात जल्लोषात साजऱ्या करून महापुरुषांचे महत्त्व आपल्या येणाऱ्या पिढीला कळल्या पाहिजे यासाठी पुढाकार घेत असतात. आपल्या महापुरुषांचे या देशासाठी काय योगदान होते आणि कसा आपला भारत देश अनेक महापुरुषांनी घडवला. आणि आपली संस्कृती रुजवली याचे महत्व पटवून देत असतात. अनेक ठिकाणी पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात जात असताना त्या ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने नाली बनून पाईप टाकून पाण्याचा निचरा करण्यात आला होता. काही ठिकाणी नागरिकांना जाण्यासाठी अडगळीचा रस्ता असल्यामुळे त्या ठिकाणी साफ सफाई करून नागरिकांना रस्ता बनवण्यात आपल्या टीम च्या सहकार्याने पुढाकार घेतला होता. अश्या प्रकारे दीपक भाऊ कांबळे यांनी विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी सुरू ठेवली आहे. या पुढे ही या पेक्षाही जास्त कामे करून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सर्व टीम सज्ज झाली आहे. जनसेवा हीच खरी समाज सेवा अशा प्रकारे त्यांचे समाजकार्य नेहमीच सुरु असते. आणि या पुढे ही समाजसेवा करण्यासाठी नेहमीच सज्ज राहील हे सांगत नागरिकांच्या समस्या सोडवताना नागरिकांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून समाधान वाटते. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल नागरिक नक्कीच घेतील अशी आशा त्यांनी व्यक्त करीत नागरिकांचे सहकार्य मिळत असल्याबाबत आभार व्यक्त केले.