• Total Visitor ( 571603 )
News photo

महानगरपालिकेकडे खाजगी रुग्णालयांमध्ये “रुग्ण हक्कांची सनद” लावण्याची मागणी

Raju Tapal publisher May 18, 2026 46

महानगरपालिकेकडे खाजगी रुग्णालयांमध्ये “रुग्ण हक्कांची सनद” लावण्याची मागणी



ठाणे :- ठाणे महानगरपालिका हद्दीतील सर्व खाजगी रुग्णालयांमध्ये “रुग्ण हक्कांची सनद” (चार्टर ऑफ पेशंट राईट्स) तसेच दरपत्रक दर्शनी भागात लावणे सक्तीचे करण्यात यावे,अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार विशाल शांताराम कुरकुटे यांनी ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.दिनांक १८ मे २०२६ रोजी आरोग्य अधिकारी, ठाणे महानगरपालिका यांना देण्यात आलेल्या निवेदनात अनेक खाजगी रुग्णालयांमध्ये रुग्ण हक्कांची माहिती दर्शनी भागात लावलेली नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना त्यांच्या हक्कांची माहिती मिळत नसून उपचार शुल्काबाबतही पारदर्शकता राहत नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार प्रत्येक खाजगी रुग्णालयाने “चार्टर ऑफ पेशंट राईट्स” व दरपत्रक दर्शनी भागात लावणे आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे.तसेच या नियमांची तात्काळ अंमलबजावणी करून जे रुग्णालय नियमांचे पालन करीत नाहीत त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी,अशी मागणीही करण्यात आली आहे.या संदर्भात ठाणे महानगरपालिकेने गंभीर दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करावी,अशी अपेक्षा विशाल कुरकुटे यांनी व्यक्त केली आहे.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement