• Total Visitor ( 695430 )
News photo

राजभवन जयपूर येथे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांची डॉ. भागवत भोरे पाटील योगी यांनी घेतली सदिच्छा भेट

Raju Tapal publisher August 13, 2026 33

राजभवन जयपूर येथे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांची डॉ. भागवत भोरे पाटील योगी यांनी घेतली सदिच्छा भेट



योग,निसर्गोपचार व अंकशास्त्राच्या विविध विषयांवर सकारात्मक चर्चा



राजू टपाल.



जयपूर:- राजस्थानचे महामहिम राज्यपाल  यांची जयपूर येथील राजभवनात डॉ. भागवत भोरे पाटील (योगी) यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी योग,निसर्गोपचार,नैसर्गिक आरोग्यपद्धती,निरोगी जीवनशैली तसेच अंकशास्त्र अशा विविध विषयांवर सकारात्मक व विचारपूर्ण चर्चा झाली. या भेटीदरम्यान डॉ. भागवत भोरे पाटील (योगी) यांनी योग व निसर्गोपचाराच्या माध्यमातून समाजामध्ये आरोग्यविषयक जनजागृती करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती राज्यपाल हरिभाऊ बागडे यांना दिली. तसेच योग,निसर्गोपचार आणि पारंपरिक आरोग्यविषयक ज्ञानाचा जनसामान्यांपर्यंत प्रसार करण्याच्या विविध संकल्पनांवरही चर्चा करण्यात आली. महामहिम राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी योग,नैसर्गिक आरोग्यपद्धती आणि समाजोपयोगी उपक्रमांविषयी आस्थेने माहिती जाणून घेतली. आरोग्यदायी जीवनशैली आणि समाजामध्ये आरोग्यविषयक जागृती निर्माण करण्याच्या उपक्रमांबाबत यावेळी सकारात्मक संवाद झाला. जयपूर येथील राजभवनात झालेली ही सदिच्छा भेट अत्यंत आनंददायी,प्रेरणादायी आणि अविस्मरणीय ठरल्याचे डॉ. भागवत भोरे पाटील (योगी) यांनी सांगितले.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026