• Total Visitor ( 636526 )
News photo

‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ ब्रीद जपणाऱ्या वाकचौरे साहेबांचा डॉ.विश्वासराव आरोटे यांच्या वतीने सत्कार!

Raju Tapal publisher June 05, 2026 83

‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ ब्रीद जपणाऱ्या वाकचौरे साहेबांचा डॉ.विश्वासराव आरोटे यांच्या वतीने सत्कार!



श्रीरामपूर :- संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरलेल्या खरात प्रकरण तसेच वडगाव पाण येथील गडगे प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणण्याचे काम करणारे श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांची आज सदिच्छा भेट घेण्यात आली. यावेळी विविध सामाजिक,कायदा व सुव्यवस्था तसेच जनहिताच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. "सद्रक्षणाय खलनिग्रहणाय" या महाराष्ट्र पोलीस दलाच्या ब्रीदवाक्यानुसार कर्तव्यनिष्ठपणे सेवा बजावत असलेल्या व वारकरी संप्रदायातील अभ्यासू व संवेदनशील अधिकारी म्हणून ओळख असलेल्या वाकचौरे साहेबांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस तथा दैनिक समर्थ गांवकरीचे संपादक डॉ. विश्वासराव आरोटे यांच्या हस्ते अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांचा घड्याळ,हरीपाठ व पेन देऊन सत्कार करण्यात आला. समाजात कायद्याबाबत विश्वास निर्माण करण्यासाठी तसेच संवेदनशील प्रकरणांचा निष्पक्ष तपास करण्यासाठी पोलीस प्रशासनाने केलेल्या कार्याचे यावेळी कौतुक करण्यात आले. सदिच्छा भेटीदरम्यान सामाजिक सलोखा,नागरिकांचे प्रश्न,पत्रकारिता आणि पोलीस प्रशासन यांच्यातील समन्वय यासह विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. वाकचौरे साहेबांच्या कार्यपद्धतीबद्दल समाधान व्यक्त करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement