• Total Visitor ( 695568 )
News photo

पॅनल क्रमांक ४ मधून वंचितच्या सुशिक्षित उमेदवार  वैशाली सुनिल गायकवाड निवडणूक लढवणार 

Raju tapal November 17, 2025 351

पॅनल क्रमांक ४ मधून वंचितच्या सुशिक्षित उमेदवार  वैशाली सुनिल गायकवाड निवडणूक लढवणार 



राजू टपाल. 

टिटवाळा :- कल्याण डोंबिवली महापालिकेच्या बल्याणी पॅनल क्रमांक ४ मधून वंचित बहुजन आघाडीच्या सुशिक्षित उमेदवार वैशाली सुनील गायकवाड ह्या निवडणूक लढवणार आहेत. 

वैशाली सुनील गायकवाड ह्या वंचित बहुजन आघाडीचे कल्याण पश्चिमचे अध्यक्ष संतोष लक्ष्मण गायकवाड यांच्या वहिनी आहेत. संतोष गायकवाड यांनी वंचितच्या माध्यमातून अनेक गोरगरीब नागरिकांसाठी लढा दिलेला आहे. गोरगरीब नागरिकांच्या हक्कासाठी,त्यांना न्याय मिळण्यासाठी संतोष गायकवाड हे नेहमीच तत्पर असतात. या माध्यमातून त्यांनी आपली वहिनी वैशाली सुनील गायकवाड यांना निवडणुकीसाठी रिंगणात उभे करून नागरिकांच्या समस्यांचा निपटारा करण्यासाठी सज्ज केलेले आहे. वैशाली सुनील गायकवाड ह्या सुशिक्षित उमेदवार असून त्यांचे शिक्षण एचएससी, डीटीएड, बीएएलएलबी एवढे झालेले आहे. होऊ द्या बदल करा योग्य निवड तुमचा विश्वास माझा ध्यास बदल घडणार युवा लढणार असे ब्रीद वाक्य घेऊन त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आहेत. बदल हवा तर चेहरा नवा असा संदेश ते आपल्या मतदारांना देणार आहेत. त्यामुळे पॅनल क्रमांक ४ मधील निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापणार यात तिळमात्र शंका नाही. सर्वसामान्य नागरिकांना,मतदारांना आपल्यातीलच एक उमेदवार उभे असल्याचे चित्र दिसून येत आहे. सर्वसामान्य उमेदवार व त्यांचा नागरिकांचा घरोघरी जाऊन प्रचार प्रसार केल्यास नक्कीच पारडे जड होईल. एकंदरीत वंचितच्या बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांना मानणारा एक मोठा चाहता वर्ग आहे. विकास आमचे ध्येय प्रामाणिकपणा आमचा मार्ग,विकास पर्व सुरु करूया एका सक्षम नेतृत्वाला संधी देऊया असे त्या म्हणतात त्यामुळे नक्कीच वंचितच्या उमेदवाराला हि नागरिक भरघोस पाठिंबा देतील असे गायकवाड यांचे म्हणणे आहे.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026