विधानसभेत निकृष्ट औषधांचा विषय गाजल्यानंतर देखील गोवेली ग्रामीण रुग्णालयाकडून दहा महिन्याच्या बाळाला मुदत संपल्याचे औषध दिले?
टिटवाळा:- अंबरनाथ तालुक्यातील वांगणी प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्भवती महिला रेणूका शिंदे ही तपासणीसाठी गेली असता तिला 'बुरशीजन्य,औषध दिले,यावर तिने तेथील डॉक्टर,नर्स,व फार्मासिस्टकडे तक्रार केली असता,एक गोळी खाल्ली असती तर तू काय मेली असती का?असे उर्मट उत्तर दिल्याने नातेवाईक संतापले होते,हा विषय नागपूर चे आमदार मोहन मते यांनी लक्षवेधी सूचनेव्दारे विधानसभेत मांडला होता,यावरून आरोग्यमंत्री प्रकाश आंबिटकर यांनी संबंधित वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना निलंबित करण्याची घोषणा विधानसभेत केली,शिवाय आरोग्य विभागाचा कारभार सुधारण्याचे निर्देश ही दिले होते. परंतु यानंतर देखील शासनाच्या आरोग्य विभागात सुधारणा झाली असे मुळीच नाही, कारण कल्याण तालुक्यातील गोवेली ग्रामीण रुग्णालयाकडून एका १० महिन्याच्या बाळाला चक्क मुदत संपलेले(एक्सपायर)झालेले औषध दिले असून यामुळे बाळाच्या नातेवाईकांसह, नागरिकांमध्ये संताप पसरला आहे. २७ मे २०२५ रोजी जन्मलेल्या कल्याण ग्रामीण गावातील एका बाळाला घेऊन त्याची आई गोवेली ग्रामीण रुग्णालयात गेली होती,बाळाला ताप व अंगावर पुळ्या आल्याने तिने डॉक्टरांना दाखवले,डॉक्टरांनी तपासून काही औषधे लिहून दिली,सदर महिला काऊंटरवर गेली असता तिला'ओपीक्लेव, हे मुदत संपलेले औषध दिले. २ फेब्रुवारी २०२६ चे हे औषध एका सामाजिक कार्यकर्तीच्या लक्षात आल्याने तिने ते बाळाला पाजू नको, एक्सपायर झालेले आहे असे सांगितले. तेंव्हा त्या बाळाच्या आईच्या लक्षात आले. हा निष्काळजीपणा बाळाच्या जीवाशी खेळ नाही का?
गोवेली ग्रामीण रुग्णालय हे ग्रामीण भागातील लोकांसाठी महत्त्वाचे आहे,परंतु येथे असे होत असेल तर खूपच गंभीर आहे,या रुग्णालयाच्या बाबतीत नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत,न तपासता औषधे देणे,पेंशट ला पुढे पाठविणे,रुग्णांकडे दुर्लक्ष करणे,रिपोर्ट वेळेवर न देणे,गोरगरीब पेंशट वर ओरडणे,वरीष्ठांचे दुर्लक्ष,इत्यादी बाबतीत लोक संताप व्यक्त करतात,आजच्याच विषयी बोलायचे तर औषधांवर निरिक्षण करणे, मुदत संपलेली औषधे वेगळी करून ती नष्ठ करण्याची, त्याची विल्हेवाट लावणे हे वैद्यकीय अधीक्षकांची जबाबदारी नाही का?या विरोधात आपण आरोग्यमंत्र्याकडे तक्रार करणार असल्याचे एका सामाजिक कार्यकर्ते नी सांगितले. याबाबत कैलास पवार,(जिल्हा शल्यचिकित्सक,ठाणे)यांना संपर्क साधला असता ते म्हणाले,'हे अंत्यत चुकीचे आहे,जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.