अखेर टिटवाळ्यातील दळवी वाड्यातील रस्त्यावर पडले डांबर
राजू टपाल.
टिटवाळा:- टिटवाळा (पूर्व ) येथील दळवीवाडा येथील रस्त्याचे खोदकाम पाण्याची लाईन टाकण्याकरिता करण्यात आले होते. मात्र काम झाल्यानंतरही सदरील रस्त्याची डागडुजी केली गेली नव्हती. दरम्यान स्थानिक रहिवाशी अँडव्होकेट जितेंद्र जोशी यांनी केडीएमसीचे अ प्रभाग क्षेत्राचे सहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी यांना काँकरीटिकरण निवेदन दिले होते. त्यानुसार सद्यस्थितीत तेथील डांबरीकरण करण्यात आले.