• Total Visitor ( 636566 )

महिला व बालविकास विभागामार्फत पीडित महिलांसाठी पाच समुपदेशन केंद्र 

Raju tapal December 12, 2024 226

महिला व बालविकास विभागामार्फत पीडित महिलांसाठी पाच समुपदेशन केंद्र 



 (जिल्हा परिषद ठाणे)- महिला व बालविकास विभागामार्फत २०२४-२०२५ या आर्थिक वर्षात महिलांसाठी विशेष योजना अंतर्गत महिलांसाठी समुपदेशन केंद्र चालवण्यात येत आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाने जिल्ह्यात पाच समुपदेशन केंद्र सुरू असून प्रत्येक केंद्रासाठी संस्थेमार्फत समुपदेशक, विधीसल्लागार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

         कौटुंबिक हिंसा, छळ, मारहाण आदी प्रकारांनी त्रासलेल्या महिलांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी  तज्ञ मार्गदर्शक नेमले गेले आहेत. नियुक्त कर्मचारी, अधिकारी पीडित महिलांची समस्या जाणून घेतात. महिलेस असलेली समस्या? त्यावर कायदेशीर मार्ग कोणते आहेत? याबाबत सल्ला दिला जातो. एकंदरीत सल्ला घेण्यासाठी आलेल्या या महिलांना सामाजिक, मानसशास्त्रीय, कायदेशीर समुपदेशन या केंद्रात केले जाते. महिलांचे समुपदेशन करण्यासाठी कार्यालयीन वेळेत कामकाज सुरू असल्याची माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय बागुल यांनी दिली.

      महिलांना कायदेशीर मदत, मानसोपचार तज्ज्ञांची मदत, पोलिसांची मदत मिळवून दिली जाते. यासाठी जिल्हा पातळीवरील संस्थेला विधी सल्लागार व समुपदेशन यांना प्रत्येकी दरमहा बारा हजार रुपये, तर तालुका पातळीवरील संस्थेला प्रत्येकी ९ हजार रुपये मानधन दिले जात आहे. 



ठाणे जिल्ह्यातील पाच समुपदेशन केंद्राचे नाव व पत्ता -

-कौंटुबिक समुपदेशन केंद्र भारतीय महिला फेडरेशन (ठाणे समिती), सार्वजनिक बांधकाम विभाग दुसरा मजला, ठाणे (प)

-कौंटुबिक समुपदेशन केंद्र भारतीय महिला फेडरेशन (ठाणे समिती), महिला व बाल सहाय्य केंद्र पंचायत समिती कार्यालय पहिला माळा, कल्याण

-महिला विकास केंद्र संस्थेचे समुपदेशन/ सल्लागार केंद्र, एकात्मक बाल विकास सेवा योजना, पंचायत समिती शहापुर, जि. ठाणे

-आश्रय महिला संस्था ,तहसिल कार्यालय बिल्डींग, अंबरनाथ पंचायत समिती कार्यालय, 3 रा मजला, के. बी. रोड, अंबरनाथ, जि. ठाणे   

-वननिकेतन संस्थेचे चेतना महिला समुपदेशन व कुटुंब सल्ला केंद्र सरकारी दवाखान्या शेजारी ता. मुरबाड जि. ठाणे 



       पीडित महिला व मुलींना आधार देण्याच्या उद्देशाने समुपदेशन केंद्र सुरू करण्यात आले असून पीडित महिलांनी या समुपदेशन केंद्रास भेट द्यावे, असे आवाहन महिला व बालविकास विभागामार्फत करण्यात येत आहे. 

000


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement