स्वातंत्र्यदिनानिमित्त होली क्रॉस हॉस्पिटल येथे झेंडावंदन व सन्मान सोहळा...
कल्याण:-कल्याणातील नामांकित होली क्रॉस हॉस्पिटल येथे भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात झेंडावंदन कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमास हॉस्पिटलमधील डॉक्टर,नर्सिंग स्टाफ,कर्मचारी,महिला भगिनी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात लहान मुलांच्या सुंदर सांस्कृतिक कार्यक्रमाने झाली. नर्सरीच्या चिमुकल्यांनी देशभक्तीपर गीते व विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. संपूर्ण वातावरण देशभक्तीच्या भावनेने भारावून गेले होते. या प्रसंगी होली क्रॉस हॉस्पिटल परिवाराच्या वतीने नगरसेवक गणेश जाधव यांचा सन्मान करण्यात आला. शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ आणि मानपत्र देऊन हॉस्पिटलच्या संपूर्ण टीमने सन्मान केला. यावेळी नगरसेवक गणेश जाधव यांनी सांगितले सन्मान माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा आणि प्रेरणादायी क्षण होता. सन्मानपत्रातील गौरवोद्गार “ज्याच्या कर्तृत्वाचे हात आभाळाला भिडतात, तो माणूस यशस्वी होतो; पण आभाळाला हात लागूनसुद्धा ज्याचे पाय सदैव जमिनीवर राहतात, तोच खऱ्या अर्थाने मोठा माणूस असतो.” अशाच एका महान व्यक्तिमत्त्वाचा आज होली क्रॉस हॉस्पिटल परिवाराच्या वतीने सन्मान केला आहे मी आपले मनःपूर्वक आभार मानतो असे सांगितले,समाजसेवेची आपली तळमळ,लोकांच्या अडचणी समजून घेण्याची संवेदनशीलता आणि त्या अडचणी सोडवण्यासाठी आपण घेत असलेली धडपड निश्चितच प्रेरणादायी आहे. होली क्रॉस हॉस्पिटल परिवाराला आपण वेळोवेळी दिलेले सहकार्य,मार्गदर्शन आणि पाठिंबा आमच्यासाठी अत्यंत मोलाचा आहे असे डॉक्टरांनी सांगितले.