• Total Visitor ( 427865 )
News photo

जि.प.शाळा व गृ.ग्रा.पंचायत रायते पिंपळोली येथे सरपंच समीक्षा सुरोशे यांच्या हस्ते ध्वजारोहण

Raju tapal January 26, 2026 310

जि.प.शाळा व गृ.ग्रा.पंचायत रायते पिंपळोली येथे सरपंच समीक्षा सुरोशे यांच्या हस्ते ध्वजारोहण



आज भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनी आदर्श सरपंच राज्य पुरस्कार प्राप्त गृप ग्राम पंचायत रायते-पिंपळोली च्या कार्यसम्राट सरपंच समिता संतोष सुरोशी यांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळा रायते,गृ.ग्रा.पंचायत रायते पिंपळोली ग्रामपंचायत कार्यालय व ओम साई प्री प्रायमरी स्कूल रायते येथे  ध्वजारोहण करण्यात आले व हा ध्वजारोहण सोहळा पार पडला. यावेळी सरपंच समिता संतोष सुरोशी यांनी तिरंग्याला मानवंदना देत स्वातंत्र्य,समता,बंधुता,धर्मनिरपेक्षता,सार्वभौमत्व,न्याय अशी मुल्ये जपत भारतीय लोकशाही अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला. या ध्वजारोहण सोहळ्याप्रसंगी उपसरपंच कु.मयुर सुरोशी,ग्राम पंचायत अधिकारी राजाभाऊ सुरवसे, माजी सरपंच संतोष नामदेव सुरोशी,माजी उपसरपंच व सदस्य कु.हरेश पवार,सदस्य सुभाष जाधव,जेष्ठ पत्रकार जैतू मुठोलकर,माजी जि.प. सदस्य महेंद्र जाधव,जेष्ठ पत्रकार नारायण सुरोशी, गुलाबताई वाघे,शाखाप्रमुख भास्कर टेंभे,व उपाध्यक्ष रा.काॅ. पार्टी रामभाऊ सुरोशी,मिलिंद चंदणे,श्रीकांत तारमळे,मनोज सुरोशी,सुदाम भोईर,शरद पवार,रायते हायस्कूल मुख्याध्यापक एस.जी. शिंदे,जि.प.शाळा मुख्य शिक्षिक शिक्षका चारूताई बोंडे,ओम साई प्री प्रायमरी इंग्लिश स्कूल च्या संस्थापक अध्यक्षा प्रमिलाताई घोडविंदे सहशिक्षका अर्चना राठोड,पुजा जाधव,ग्रामपंचायत लिपिक मानसी देसले,कर्मचारी मनिषा जाधव,अंगणवाडीती सेविका कुसूम जाधव,मदतनीस अनिता वाघे,सदस्य व सदस्या,युवक,शिक्षक,शिक्षिका,शिक्षकेतर कर्मयोगी,बचतगट महिला भगिनी,सिआरपी,राजकिय,विद्यार्थी, विद्यार्थीनी व सामाजिक क्षेत्रातील सर्व कार्यकर्ते,पत्रकार यांच्यासह देशप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात ध्वज संचलन व ध्वजाला सलामी देण्याची महत्वपूर्ण भुमिका सोनटक्के सर यांनी पार पाडली,या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मंदाकिनी पाटील यांनी त्यांच्या भारदस्त वक्तृत्व शैलीत शब्दांची गुंफण करून खूपच सुंदर केले,हा कार्यक्रम सर्वाच्याच उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement