• Total Visitor ( 385217 )
News photo

पाॅलिबाॅण्ड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड,इनलॅक्स बुधराणी हाॅस्पिटल यांच्या वतीने आयोजित केलेले मोफत नेत्र चिकित्सा तपासणी शिबिर संपन्न

Raju tapal December 24, 2025 53

पाॅलिबाॅण्ड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड,इनलॅक्स बुधराणी हाॅस्पिटल यांच्या वतीने आयोजित केलेले मोफत नेत्र चिकित्सा तपासणी शिबिर संपन्न

           

शिक्रापूर:- शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथील पॉलिबॉन्ड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि इनलॅक्स बुधराणी हॉस्पिटल यांच्या वतीने मोफत नेत्र चिकित्सा तपासणी शिबिराचे रविवार दिनांक २१ डिसेंबर २०२५ रोजी आयोजन करण्यात आले होते. पाॅलिबाॅण्ड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नगररोड,सणसवाडी येथे पार पडलेल्या नेत्र चिकित्सा तपासणी शिबिरात २९५ जणांची तपासणी करण्यात आली  या तपासणीत ४३ मोतीबिंदूचे रुग्ण आढळले त्यांना त्यांच्या ऑपरेशनच्या तारखा देण्यात आल्या .७५ जणांना चष्मे वाटप करण्यात आले. शिक्रापूर गावचे सरपंच रमेशराव गडदे,पॉलीबॉन्ड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड व्यवस्थापनचे,जनरल मॅनेजर प्रीती वर्मा मॅडम,जनरल मॅनेजर निलेश पाटील सर,डेप्युटी मॅनेजर विशाखा केसरे मॅडम,सिनिअर मॅनेजर शरद राऊत सर,सिनिअर मॅनेजर आदेश वीर सर,स्वयंसेवक नेहा जोशी,सचिन शिर्के,समीक्षा राजस,सोनाली धुमाळ,आरती बेलोटे,श्रीदीप घोगरे,शुभम चव्हाण,मनीषा बाथम,श्वेता पाठक,संदीप कदम,फिरोज शेख,अनुभव दुबे,हेमंत नेहाते,अमरदीप मेश्राम,विशाल मंडलिक,संदिप जाधव,मंगेश बुकतरे,दीपक गव्हाणे,शंकर थिटे,फकीर रणपिसे,नीलेश खंडारे,शैलेश खंडारे,दादासाहेब पवार,संतोष नरके,विवेक सोनवणे,विश्वजीत सुरवसे,गजानन पाटील,संदिप हिंदोळे,सुरेश चव्हाण,राकेश गार्लेपाटी,वैभव ढोकले,महेश शिर्के,सत्यवान भुजबळ,राजाभाऊ गायकवाड,निलेश जगताप,महम्मदभाई तांबोळी तसेच नागरिक मोठ्या संख्येने नेत्रचिकित्सा,तपासणी शिबिरास उपस्थित होते. मागील ४६ वर्षांपासून पाॅलिबाॅण्ड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड "सी एस आर"अंतर्गत शाळांसाठी बॅच,शाळांसाठी वर्गखोल्या,शाळांसाठी संगणक,महिला शाळा,मरकळ गावच्या जवळच्या शाळांसाठी स्वच्छता पॅड,वारकरी पोलीस बंदोबस्त जेवण,१ जानेवारीला विजय स्तंभ कार्यक्रमासाठी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीसांना जेवण,वृक्षारोपण, क्तदान शिबीरे,आरोग्य तपासणी शिबिर,नेत्र तपासणी शिबिर इत्यादी सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले.

          


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement