टिटवाळ्यात निरामय हॉस्पिटलच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर
राजू टपाल.
टिटवाळा:- निरामय हॉस्पिटल, टिटवाळा यांच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त नागरिकांसाठी दि. १५ ऑगस्ट ते २३ ऑगस्ट २०२६ या कालावधीत दररोज सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मोफत ओपीडी सेवा व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांचा मोफत सल्ला,मोफत औषध वाटप तसेच मोफत HbA1c तपासणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच लिपिड प्रोफाइल व इतर रक्त तपासण्यांवर ५० टक्के सवलत,एक्स-रे तपासणीवर ५० टक्के सवलत आणि मोफत डोळे तपासणी करण्यात येणार आहे. टिटवाळा व परिसरातील नागरिकांना आरोग्यविषयक तपासणी करून घेण्याची ही चांगली संधी असून,जास्तीत जास्त नागरिकांनी या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा,असे आवाहन निरामय हॉस्पिटलचे संचालक डॉ. प्रवीण कांबळे यांनी केले आहे.
शिबिराचा कालावधी : १५ ऑगस्ट ते २३ ऑगस्ट २०२६
वेळ : सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत
स्थळ : निरामय हॉस्पिटल,टिटवाळा
अधिक माहितीसाठी संपर्क 8097460045 या नंबरवर संपर्क साधावा