निरामय हॉस्पिटलतर्फे ‘स्वस्थ टिटवाळा मोहिम’ अंतर्गत मोफत महाआरोग्य तपासणी शिबिर
राजू टपाल.
टिटवाळा :- टिटवाळा शहर व परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने निरामय हॉस्पिटल टिटवाळा यांच्या वतीने ‘स्वस्थ टिटवाळा मोहिम’ राबविण्यात येत असून या मोहिमे अंतर्गत मोफत महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. रविवारी टिटवाळा गोवेली रोडवरील पद्मावती या निवासी भागात आरोग्य शिबीर राबविण्यात आले. या शिबिरामध्ये नागरिकांसाठी रक्तदाब तपासणी,मधुमेह तपासणी तसेच सामान्य आरोग्य तपासणी कारण्याबरोबच तज्ञ डॉक्टरांकडून मोफत वैद्यकीय सल्ला देण्यात आला. या शिबिराचा मुख्य हेतू म्हणजे निरामय हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेल्या मुख्यमंत्री साह्यता निधी तसेच विविध ट्रस्टमार्फत दिल्या जाणाऱ्या मोफत आरोग्य सेवा व शस्त्रक्रियांचा लाभ गरजू रुग्णांपर्यंत पोहोचवणे हा आहे. या योजनांबाबत नागरिकांना मार्गदर्शनही करण्यात येणार आहे. या शिबिरामध्ये डॉ.अविनाश रामचंद्रन,MD (मेडिसिन),AIIMS – जोधपूर (फिजिशियन व डायरेक्टर) व डॉ. प्रवीण कांबळे संचालक निरामय हॉस्पिटल हे विशेष उपस्थित राहून नागरिकांची तपासणी व मार्गदर्शन केले. टिटवाळा शहर व परिसरातील नागरिकांनी या मोफत महाआरोग्य तपासणी शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन निरामय हॉस्पिटलतर्फे करण्यात आलेले आहे.