स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी. गुजर प्रशालेत सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी
शिक्रापूर:- शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी. गुजर प्रशालेत शनिवार दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश ढमढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास शिक्षण प्रसारक मंडळ,तळेगाव ढमढेरेचे संचालक महेश ढमढेरे,तळेगाव ढमढेरे गावाचे माजी सरपंच विश्वास ढमढेरे,सामाजिक कार्यकर्ते शहाजी ढमढेरे,कैलास नरके उपस्थित होते. महेशबापू ढमढेरे व विश्वासराव ढमढेरे यांच्या हस्ते ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी महेशबापू ढमढेरे यांनी त्यांच्या भाषणात सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणकार्याचा,समाजसुधारणेतील योगदानाचा व त्यांनी केलेल्या त्यागाचा प्रेरणादायी शब्दांत आढावा घेतला.
कार्यक्रमास प्रशालेचे मुख्याध्यापक अशोक दहिफळे,उपमुख्याध्यापक सुनिता पिंगळे पर्यवेक्षक मोहन ओमासे, सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी प्रशालेतील विद्यार्थिनींनीही सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याची माहिती सादर करून कार्यक्रमात सहभाग घेतला. कार्यक्रम प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.