• Total Visitor ( 516401 )
News photo

स्वातंत्र्य सैनिक रायकुमार बी. गुजर उच्च माध्यमिक  प्रशालेची बारावीच्या परीक्षेत उज्वल निकालाची परंपरा कायम

Raju Tapal publisher May 03, 2026 161

स्वातंत्र्य सैनिक रायकुमार बी. गुजर उच्च माध्यमिक  प्रशालेची बारावीच्या परीक्षेत उज्वल निकालाची परंपरा कायम



शिरूर:- शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव ढमढेरे संचलित स्वातंत्र्य सैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेने बारावीच्या निकालात बाजी मारत उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखली आहे. प्रशालेचा एकूण निकाल 91.53 टक्के लागला आहे. गुजर प्रशालेत कला,वाणिज्य आणि विज्ञान या शाखेचे एकूण 237.विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी 216 विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. विज्ञान शाखेचे एकूण100 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी 99 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विज्ञान शाखेचा निकाल 99% लागला आहे.. वाणिज्य शाखेचे एकूण 81 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी 75 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. वाणिज्य शाखेचा निकाल 92.59% लागला आहे.कला शाखेला एकूण 55 विद्यार्थी बसले होते त्यापैकी 42 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कला शाखेचा निकाल 76.36% लागला आहे .

विज्ञान शाखा प्रथम तीन क्रमांक.

१. ढमढेरे साक्षी संदीप 68.33%

२ शिंदे अमृता अविनाश 64.00%

३ नरके भक्ती संतोष 63.00%

वाणिज्य शाखा प्रथम तीन क्रमांक 

१.ढमढेरे सार्थक सुनिल 84.83%

२.केदारी स्नेहल संतोष 81.67%

३.भोरडे सृष्टी नवनाथ 81.50%

कला शाखा प्रथम तीन क्रमांक 

१.जमधाडे अंकिता दत्ता  56.83%

२. लोखंडे अद्वैत मधुकर  55.50%

३. रासकर सोनाली दत्तात्रय 55.33%

अशी माहिती प्रशालेचे प्राचार्य अशोक दहिफळे यांनी दिली. प्रशालेच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष कौस्तुभकुमार गुजर,उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते,मानद सचिव अरविंददादा ढमढेरे,जेष्ठ संचालक विजयराव ढमढेरे,विद्या सहकारी बँकेचे संचालक व संस्थेचे संचालक महेशबापू ढमढेरे,प्राचार्य अशोक दहिफळे,उपप्राचार्या सुनीता पिंगळे,पर्यवेक्षक मोहन ओमासे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement