• Total Visitor ( 670314 )
News photo

 "स्वामी विवेकानंद" व "जिजाऊ माँ साहेब" यांच्या जयंती दिनी महानगरपालिकेतर्फे अभिवादन ! 

Raju tapal January 12, 2026 106

 "स्वामी विवेकानंद" व "जिजाऊ माँ साहेब" यांच्या जयंती दिनी महानगरपालिकेतर्फे अभिवादन ! 



 "स्वामी विवेकानंद" व "जिजाऊ माँ साहेब" यांच्या जयंती दिनी आज महापालिका मुख्यालयात त्यांच्या प्रतिमेस मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव,कार्यकारी अभियंता जितेंद्र शिंदे,यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. या समयी उपस्थित कार्यकारी अभियंता शैलेश मळेकर,शिक्षणाधिकारी विजय सरकटे,३/क प्रभागाचे सहा.आयुक्त धनंजय थोरात माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे,सुरक्षा अधिकारी भरत बुळे,अधीक्षक समाधान मोरे  तसेच इतर अधिकारी/कर्मचारी वर्गांने  देखील"स्वामी विवेकानंद" व "जिजाऊ माँ साहेब"* यांच्या प्रतिमेस पुष्पसुमने अर्पण करुन अभिवादन केले. कल्याण (पश्चिम),पारनाका येथील "स्वामी विवेकानंद" यांच्या पुतळयास ३/क प्रभागाचे सहा.आयुक्त धनंजय थोरात यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. डोंबिवली पूर्व येथील महापालिकेच्या जुन्या डोंबिवली विभागीय कार्यालयाजवळील  "स्वामी विवेकानंद" यांच्या पुतळयास ६/फ प्रभागाचे सहा.आयुक्त प्रसाद ठाकुर यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. या समयी सहा.सुरक्षा अधिकारी सुरेश पवार,इतर कर्मचारी व नागरिक उपस्थित होते .


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement