• Total Visitor ( 427880 )
News photo

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महापौर पदी महायुतीच्या हर्षाली थविल तर उपमहापौर पदी राहुल दामले यांची बिनविरोध निवड

Raju tapal February 03, 2026 70

 कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महापौर पदी महायुतीच्या हर्षाली थविल तर उपमहापौर पदी राहुल दामले यांची बिनविरोध निवड





कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महापौर पदि महायुतीच्या शिवसेनेच्या हर्षला थवील/चौधरी तर उपमहापौर पदी भाजपचे राहुल दामले यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी तथा मुंबई शहर जिल्हा अधिकारी आचल गोयल यांनी जाहीर केले. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी महायुतीच्या वतीने महापौर पदासाठी हर्षाली थविल तर उपमहापौर पदासाठी राहूल दामले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्या प्रमाणे 3 फेबुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा पिठासीन अधिकारी तथा मुंबई शहर जिल्हा अधिकारी आचल गोयल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली,महापौर व उपमहापौर पदासाठी प्रत्येकी एक एक अर्ज दाखल केला होता, त्या प्रमाणे अर्जाची छाननी करून वैध असल्याचे सांगितले व महापौर पदासाठी हर्षाली थविल व उपमहापौर पदासाठी राहूल दामले यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. यावेळी शासनाच्या वतीने तसेच महापालिकेच्या वतीने नवनिर्वाचित महापौर हर्षाली थविल/चौधरी व उपमहापौर राहुल दामले यांचे स्वागत करण्यात आले,यावेळी शुभेच्छा देण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री कपील पाटील,खासदार डॉ.श्रीकांत शिंदे,आमदार राजेश मोरे,आमदार सुलभा गायकवाड,जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे,जिल्हा प्रमुख अरविंद मोरे आदी उपस्थित होते.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement