• Total Visitor ( 351450 )
News photo

मुंबई,कोकणसह राज्यात पुढील २ दिवस जोरदार पाऊस कोसळणार

Raju tapal May 22, 2025 49

मुंबई,कोकणसह राज्यात पुढील २ दिवस जोरदार पाऊस कोसळणार;

रायगड,रत्नागिरी,सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी 



मुंबई :- मुंबई आणि कोकणासह राज्यभरात 24 मे पर्यंत जोरदार पावसाची शक्यता आहे. 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याचीही शक्यताही आहे. हवामान विभागाने याबाबत अंदाज वर्तवला आहे. रायगड,सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी जारी करण्यात आला आहे.काही भागात अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह 100 मिमीहून अधिक पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.



तळकोकणात सलग तिसऱ्या दिवशीही मान्सूनपूर्व पावसाने झोडपले.रात्रभर जिल्ह्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळत होत्या.जिल्ह्यात 23 मे पर्यंत मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.गोवा तसेच लगतच्या कर्नाटक किनारपट्टीला समांतर अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने या क्षेत्राची तीव्रता वाढणार असून,ते पुढे उत्तरेकडे सरकणार आहे.याच्या प्रभावामुळे कोकणात पावसाचा जोर कायम असणार आहे.पश्चिम किनारपट्टीवर जोरदार वारे वाहणार असून,मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.



महाराष्ट्र आणि गोव्या जवळ अरबी समुद्रात 21 मेपासून कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.24 मेपर्यंत तो अधिक तीव्र होऊन उत्तरेकडे सरकू शकतो.राज्याच्या किनाऱ्याला थेट धोका नसला तरी याचा परिणाम म्हणून समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता आहे.त्यामुळे मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रायगड,रत्नागिरी,मुंबई आणि पालघरजवळ 22 ते 24 मे दरम्यान समुद्र खवळू शकतो.तर खोल समुद्रात जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.त्यामुळे मासेमाऱ्यांनी हवामान बदलांवर लक्ष ठेवून या काळात खोल समुद्रात जाणे टाळावे,असा इशारा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिला आहे.


Share This

वेबसाइट बनवा — व्यवसाय वाढवा

✨ किंमत फक्त ₹ 999 पासून सुरू!

📞 संपर्क: +91 7208299790 🌐 १ वर्षासाठी डोमेन, होस्टिंग आणि SSL “ मोफ़त ”

titwala-news

Advertisement

Advertisement