सांगोडा गावातील घरफोडी प्रकरणाचा छडा;चार आरोपी ताब्यात कल्याण तालुका पोलिसांची कारवाई
राजू टपाल.
टिटवाळा :- सांगोडा गावात झालेल्या घरफोडीच्या प्रकरणाचा कल्याण तालुका पोलिसांनी तपास करून चार संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी कल्याण तालुका पोलीस ठाणे CR No. 686/2026 अन्वये BNS कलम 309(9),3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत या गुन्ह्यातील आरोपींची माहिती मिळवून त्यांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये रुपेश रमेश म्हात्रे (वय 31),दर्शन रमणाथ भोसले (वय 28),विजय दामोदर चव्हाण (वय 40) आणि सर्जा सुरेश जाधव (वय 30) यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. सांगोडा गावात झालेल्या या घरफोडीमुळे परिसरात खळबळ उडाली होती. पोलिसांच्या कारवाईनंतर या प्रकरणातील इतर बाबींचा तपास सुरू असून,चोरीला गेलेल्या मुद्देमालाबाबत तसेच गुन्ह्यातील आरोपींच्या सहभागाबाबत पुढील तपास केला जात आहे.
कल्याण तालुका पोलिसांच्या या कारवाईमुळे सांगोडा परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.