• Total Visitor ( 351504 )
News photo

टिटवाळ्यात यशश्री वेलनेस सेंटरचे पदमश्री डॉ.तात्याराव लहाने यांच्या हस्ते उदघाटन 

Raju tapal December 04, 2025 459

टिटवाळ्यात यशश्री वेलनेस सेंटरचे पदमश्री डॉ.तात्याराव लहाने यांच्या हस्ते उदघाटन 

राजू टपाल. 

टिटवाळा :- मनीषा आणि किसन मुंडे यांनी सुरु केलेल्या यशश्री वेलनेस सेंटरचा भव्य उदघाटन सोहळा गुरुवारी सकाळी साडे नऊ वाजताच्या दरम्यान मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्य संचालक व प्रिसिद्ध नेत्ररोग तज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते फित कापून उदघाटन करण्यात आले. 

स्व.आनंद दिघे मार्गावरील शिवसेना शाखेच्या समोर साई भवतारणी इमारतीत सुरु झालेल्या या यशश्री वेलनेस सेंटरच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ जागतिक आरोग्य सल्लागार डॉ.अर्जुन सुसे,जयश्री गोपालघरे,शिवाजी गोपालघरे,आरोग्य सल्लागार संतोष सांगळे,विश्व्जीत देवनाथ,मोहनदास पाटील यांच्यासह अनिल फड,विजय आव्हाड,दीपक कांबळे,दादा खिसमतराव,सुरज पाटील,वैंकट पैठणे, शिर्डी येथील पिंपळवडीचे सरपंच जालिंदर तुरकने,सागर मगर,अविनाश कालेकर,भूपेंद्र सिंग,पूजा मगर,शर्मिला पाटील,सुनंदा कालेकर इत्यादी जण प्रमुख उपस्थितीत होते. 

यावेळी बोलताना पदमश्री डॉ.तात्याराव लहाने यांनी सांगितले कि,सदरील सेंटरचा उद्देश खूप चांगला आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात माणसाला मानसिक,शारीरिक,उच्चरक्तदाब,मधुमेह,हृदयाचे आजार इत्यादी व्याधींनी ग्रासलेले आहे. त्यामुळे व्यायामा बरोबरच संतुलित आहार घेतल्यास आपल एक किलो वजन कमी झाले तरी एक वर्ष आयुष्य वाढणार आहे. आपल्या आरोग्याकडे आपणच लक्ष देण्याची व स्वतःची काळजी घेण्याची खूप गरज असून या वेलनेस सेंटरच्या माध्यमातून सर्वांचे वजन कमी व्हावे अश्या शुभेच्छा दिल्या. 

यावेळी किसन मुंडे यांनी सांगितले कि,गेल्या चार वर्षांपासून आम्ही ऑनलाइनच्या माध्यमातून अनेक सेमिनार घेण्याबरोबरच अनेकांची वजन कमी केलेत. त्यासाठी अनेक शिबिरेही  घेत आलोय. मात्र ऑफलाईन आपलं स्वतःच एक सेंटर असावं असा मानस व्यक्त करीत हे सेन्टर उघड केले. वरिष्ठ आरोग्य सल्लागार शिवाजी गोपालघरे यांच्या मार्गदर्शनामुळे मी माझे स्वतःचे २४ किलो वजन कमी करण्यात यशस्वी झालो त्यासाठी त्यांनी शिवाजी गोपालघरे यांचे आभार मानले. या वेलनेस सेंटरच्या माध्यमातून अनेक नागरिकांची आरोग्य सेवा करण्यास मिळावी हा हेतू स्पष्ट केला. यावेळी प्रमुख पाहुण्यांचा यथोचित सत्कार मनीषा मुंडे आणि किसन मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला.


Share This

वेबसाइट बनवा — व्यवसाय वाढवा

✨ किंमत फक्त ₹ 999 पासून सुरू!

📞 संपर्क: +91 7208299790 🌐 १ वर्षासाठी डोमेन, होस्टिंग आणि SSL “ मोफ़त ”

titwala-news

Advertisement

Advertisement