• Total Visitor ( 695455 )
News photo

विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाची राजकीय पक्षांना माहिती व मार्गदर्शन

Raju Tapal publisher September 02, 2026 26

 



विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाची राजकीय पक्षांना माहिती व मार्गदर्शन



सिंधुदुर्ग:- विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात तरिणी सभागृहात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या उपस्थितीत नोंदणीकृत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत प्रारूप मतदार यादीची सविस्तर माहिती देण्यात आली तसेच मतदार यादीतील नोंदींबाबत दावे व हरकती सादर करण्याच्या प्रक्रियेविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे उपस्थित होते. यावेळी राजकीय प्रतिनिधींना विधानसभा मतदारसंघनिहाय प्रारूप मतदार यादीची माहिती देण्यात आली. मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत व सर्वसमावेशक करण्यासाठी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनीही सहकार्य करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले. प्रारूप मतदार यादीतील नाव, पत्ता अथवा अन्य तपशिलांबाबत काही त्रुटी असल्यास किंवा पात्र मतदाराचे नाव समाविष्ट करावयाचे असल्यास विहित मुदतीत दावे व हरकती सादर करता येणार आहेत. ३० सप्टेंबर पर्यंत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार असून,प्राप्त दावे व हरकतींवर नियमानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे. बैठकीत उपस्थित नोंदणीकृत राजकीय प्रतिनिधींना प्रारूप मतदार यादीचे वाटप करण्यात आले. मतदार यादीचे बारकाईने परीक्षण करून आवश्यक असल्यास विहित मुदतीत दावे व हरकती सादर कराव्यात,असे आवाहन यावेळी करण्यात आले. विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून मतदार यादीतील नोंदी अधिक अचूक करण्याचा प्रयत्न करण्यात येत असून,या प्रक्रियेसाठी नागरिकांसह राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी सहकार्य करावे,असेही बैठकीत सांगण्यात आले.



 



 



 



 



 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026