खेळात जिंकणे, हारने यापेक्षाही महत्वाचे आहे सहभागी होणे... दिपकजी कोकतरे, (गटशिक्षणाधिकारी,पं.स.भातकुली)?
जि.प.पूर्व माध्य मराठी शाळा, आसरा ठरली सातवीबार प्राथमिक, माध्यमिक व जनरल चॅम्पियन्स ची मानकरी.
भातकुली - पं.स.भातकुली अंतर्गत तालुकास्तरीय विद्यार्थी क्रीडा स्पर्धेचे आयोजन १०व११ जानेवारी २०२५ ला संत गाडगेबाबा विद्यालय सायत,या ठिकाणी करण्यात आले होते.खेळात हारणे,जिंकणे या पेक्षाही सहभागी होणे महत्वाचे आहे.प्राथमिक स्तरातुन राष्ट्रीय खेळाडू तयार होत असतात.ग्रामिण भागातील खेळाडू वृत्तीलावाव मिळावा म्हणुन क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले जाते,असे प्रतिपादन भातकुली पं.स.चे गटशिक्षणाधिकारी दिपक कोकतरे यांनी व्यक्त केले.
?दोन दिवस चाललेल्या या क्रीडा स्पर्धेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमासह कबड्डी, खोखो,हॉलीबॉल,लंगडी,बॅडमिंटन, रिले रेस, कुस्ती,टेनिक्वाईट,धावणे, लांब उडी,उंच उडी, या सारखे सांघिक व वैयक्तिक खेळ घेण्यात आले.
?क्रीडा स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी बक्षीस वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,या कार्यक्रमाला बक्षीस वितरक म्हणून प्रविन वानखेडे (गटविकास अधिकारी, पं.स.भातकुली)उपस्थित होते,तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अन्नपूर्णाताई ज्ञा. मानकर (सरपंच, सायत) ह्या उपस्थित होत्या,कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून विशालदादा भट्टड (उपसरपंच, सायत), दिपक कोकतरे (गटशिक्षणाधिकारी, पं. स.भातकुली), रामराम वानखडे (सदस्य,ग्रामपंचायत सायत),अशोकराव राऊत (पोलीस पाटील,सायत),संजय इंगळे (सेवानिवृत्त शिक्षक),संजय समदूरे (सामाजिक कार्यकर्ते) पुष्पाताई रामावत (मुख्याध्यापिका,संत गाडगेबाबा विद्यालय,सायत), पंजाबराव पवार (शिक्षण विस्तार अधिकारी) जानराव सुलताने (केंद्रप्रमुख आष्टी), निताताई सोमवंशी (केंद्रप्रमुख गणोरी), नरेंद्र धनस्कर (केंद्रप्रमुख पूर्णानगर), उमेश चुनकीकर (केंद्रप्रमुख खोलापूर), रविंद्र धरमठोक (केंद्रप्रमुख वाठोडा शुकलेश्वर), प्रफुल वाठ सर (केंद्रप्रमुख खारताळेगाव), किशोर रुपणारायन (केंद्रप्रमुख आसरा), रज्जब शाह सर (उच्च श्रेणी मुख्याध्यापक, भातकुली), प्रशांत भाकरे व शैलेंद्र स.दहातोंडे (केंद्रप्रमुख भातकुली)उपस्थित होते.
?बक्षीस वितरण सोहळ्यात जि.प.पूर्व. माध्य मराठी शाळा,आसरा ही प्राथमिक विभाग,माध्यमिक विभाग, व जनरल चॅम्पियन्स ची सातवीबार मानकरी ठरली,तर जि.प.पूर्व माध्य मराठी शाळा खोलापूर मुले उत्कृष्ट निदर्शन ची मानकरी ठरली,तर सांस्कृतिक विभागामधून जि.प.पूर्व माध्य मराठी शाळा वाकी रायपूर प्रथम क्रमांक तर जि.प.पूर्व माध्य उर्दू शाळा खोलापूर कन्या द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले.
?क्रीडा महोत्सव मध्ये विविध समित्यावर काम केलेल्या शिक्षक बंधू भगिनींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान,सत्कार करण्यात आला.
?कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेंद्र स.दहातोंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन मा.वसंतजी लोहेकर सर यांनी मानले.असे प्रसिध्दी प्रमुख राजेश सावरकर यांनी कळविले आहे.